एक्स्प्लोर

Safer Internet Day: आज 'सेफर इंटरनेट डे'...दोन मिनीटात तुमचे अकाउंट सुरक्षित करा

सर्वप्रथम 2004 साली युरोपमध्ये 'सेफर इंटरनेट डे' ( Safer Internet Day) साजरा करण्यात आला. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे

 Safer Internet Day: आज गुगलचे होम पेज पाहिलंय का? त्यात काही नवीन नाही असं सांगत अनेकांनी पेजच्या खालच्या बाजूला देण्यात आलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. गुगलच्या खाली आज 'सेफर इंटरनेट डे' असल्याचं सांगत आपले अकाउंट सुरक्षित करण्यासाठी केवळ दोन मिनीटे लागतील असं सांगण्यात आलंय.

आजचा दिवस जगभर 'सेफर इंटरनेट डे' म्हणजे सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची असल्याने आजच्या दिवशी 9 फेब्रुवारीला सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतोय.

सर्वप्रथम 2004 साली युरोपमध्ये 'सेफर इंटरनेट डे' साजरा करण्यात आला. तो काळ इंटरनेटचा वापर मर्यादित असण्याचा होता. पण भविष्यातील इंटरनेटच्या सुरक्षिततेचं महत्व लक्षात घेता तो युरोपमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपच्या या कृतीचे अनुकरण हळूहळू अनेक देशांनी केलं. सध्या जगातील जवळपास 150 देशांत आज सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतोय.

कोरोनाच्या काळात भारतातील इंटरनेटच्या वापरात आधीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचं एक अहवाल सांगतोय. त्यामध्ये वर्क फ्रॉम होम तसेच इतर काही कारणामुळे अनेक आर्थिक व्यवहार हे मोबाईल अथवा इतर ऑनलाइन माध्यमातून झाले आहेत. त्या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की या काळात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आजच्या काळात बरेच व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात. त्यामध्ये प्रत्येकालाच सुरक्षिततेचं महत्व लक्षात येतं असं नाही. अनेकदा बॅंकेतून फोन आला असं सांगून बँक डिटेल्स घेतले जातात आणि अकाउंटवरचे पैसे हडपले जातात. अनेकदा फेसबुक अथवा इतर सोशल मीडियावरचे मुलींच्या फोटोचा गैरवापर केला जातो, त्यांना बदनाम केलं जातं. आर्टिफिशीअल इन्टेलिजन्सचा वापर करुन अनेकदा चुकीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले जातात.

Jamtara : जामताराच्या एका 'हॅलो' वर लोक होतात कंगाल! काय आहे जामतारा?

ऑनलाइन वर्तन इंटरनेटच्या माध्यमातून जग जसं आपल्या मुठ्ठीमध्ये आलं आहे तसा त्याचा धोकाही वाढला आहे. त्याचा वापर करताना सुरक्षिततेच्या खबरदारी घेण्यात आल्या नाहीत तर आपल्याला आर्थिक आणि मानसिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपण सुरक्षितता बाळगायला हवी. खासकरुन तरुण वयातील मुलांनी याची काळजी घेतली पाहिजेत. पालकांनीही आपली मुले इंटरनेटवर काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत याची खातरजमा करणे आवश्यक आहे. ऑनलाइन गुन्हे करणारे हॅकर्स अथवा गुन्हेगार या अल्पवयीन मुलांचा वापर करुन घेतात. त्यामुळे आत्महत्येच्या कित्येक घटना घडल्याचं समोर आलंय.

कोणतेही अॅप वापरताना किंवा पेजवर जाताना आपण अनावश्यक परवानग्या देतो. त्याचा फायदा घेऊन संबंधित कंपन्या आपला डेटा गोळा करतात, तसेच त्याचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केला जातो. केवळ एका क्लिकवर आपल्या आयुष्यभराची कमाई उडू शकते. असे अनेक धोके इंटरनेट वापरताना असतात.

अशा वेळी सायबर पोलिसांनी आवाहन केल्याप्रमाणे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नये. त्यामुळे आपला सगळा डेटा वा पासवर्ड हे गोळा केले जातात. तसेच फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेऊ नये.

मुंबईतील व्यापाऱ्याची 12 लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर सेलच्या तत्परतेमुळे पैसे मिळाले परत

पासवर्ड स्ट्राँग असने आवश्यक आपले इंटरनेट सुरक्षित ठेवायचे असेल तर आपला पासवर्ड हा स्ट्राँग असला पाहिजे. तो आपले नाव, किंवा जन्मतारीख नसावी. त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरचा वापर करायला हवा. आपला पासवर्ड हा ठराविक काळानंतर सातत्याने बदलला पाहिजे.

अशा वेळी गुगल सांगतंय की तुमचे इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी केवळ दोन मिनीटाचा वेळ लागेल. त्यामध्ये आपण कोणते डिव्हाइस वापरतोय, किंवा आपला पासवर्ड बदलला आहे का, तो कधी आणि कुठे बदलण्यात आलाय याची माहिती गुगलवर मिळतेय. त्यामध्ये काही शंकास्पद वाटत असेल तर त्याचे व्हेरिफिकेशनही करण्याची सोय गुगलने उपलब्ध करुन दिली आहे.

या व्यतिरिक्त कोणत्या थर्ड पार्टीकडे तुमच्या इंटरनेटचा अॅक्सेस आहे का हेही सांगितलं जातंय. त्यामध्ये काही शंकास्पद वाटल्यास त्या थर्ड पार्टीला अॅक्सेस नाकारता येऊ शकतो. तसेच आपण किती ठिकाणी आपला पासवर्ड सेव्ह करुन ठेवलाय याचीही माहिती मिळते. त्यामुळे गुगलच्या या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने आज जगभर इंटरनेटच्या सुरक्षित वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे, त्या बद्दल जागरुकता करण्यात येत आहे. इंटरनेट वापरताना काही निर्देशांचे पालन करण्यासाठी अथवा त्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला काही सेकंदाचा वेळ लागतो, पण त्यामुळे केवळ आपले इंटरनेटच नव्हे तर भविष्यही सुरक्षित होतं हे नक्की.

ऑनलाइन कोविडची लस बुक करत असाल तर सावधान !महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget