एक्स्प्लोर
IRCTC ची नवी ऑफर, प्रीपेड फूड ऑर्डरवर 50 टक्के कॅशबॅक
नवी दिल्ली : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) एक नवी योजना लॉन्च केली आहे. या योजनेनुसार किमान 300 रुपयांपर्यंतच्या प्री-पेड ऑर्डर्सवर 50 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. ई-कॅटरिंग सुविधेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, या दृष्टीने आयआरसीटीसीने या नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे.
आयआरसीटीसीचे सीएमडी ए. के. मनूचा यांच्या माहितीनुसार, रेल्वेची ही ऑफर आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग वेबसाईटवर 13 मेपासून सुरु झाली आहे. या ऑफरनुसार प्रवाशांना निम्मे पैसे परत तेव्हाच मिळतील, जेव्हा आयआरसीटीसीच्या माध्यमातून किमान 300 रुपयांचं जेवण ऑर्डर केलं असेल.
"आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग सुविधा, ज्यामध्ये खाण्या-पिण्याच्या बाबतीत पर्याय दिले गेले आहेत. आता रेल्वे प्रवाशांमध्ये ही योजनाही लोकप्रिय होताना दिसते आहे. 50 टक्के कॅशबॅक ऑफरला प्रवाशीही चांगला प्रतिसाद देत आहेत.", असे मनूचा यांनी सांगितले.
रेल्वे प्रवाशी जेवण www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवरुन किंवा Food Track या मोबाईल अॅपवरुन ऑर्डर करु शकतात. या वेबसाईट किंवा अॅप वगळता इतर ठिकाणहून प्रवाशांनी जेवण मागवल्यास, त्यांना कोणतीही कॅशबॅक ऑफर किंवा जेवण परतही घेतले जाणार नाही.
डिलिव्हरी डेटनंतर कॅशबॅक प्रक्रिया सुरु होईल आणि बुकिंगसाठी वापरण्यात आलेल्या अकाऊंटमध्येच कॅशबॅकचे निम्मे पैसे जमा होतील. कॅशबॅकची प्रक्रिया संपल्यानंतर आयआरसीटीसीकडून संबंधित प्रवाशाल कळवण्यात येईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement