एक्स्प्लोर
कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हातात नोटा आहेत, किंवा बँकेत पैसे आहेत, मात्र ते वापरता येत नसल्याची अगतिकता अनेक जण व्यक्त करत आहेत. डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून खर्च करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
पेटीएम
ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या वापर आर्थिक व्यवहारांसाठी करता येऊ शकतो. दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठूनही मनी ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएमचा वापर करता येऊ शकतो. या वॉलेटद्वारे मोबाईल रिचार्ज, विविध बिलं, बस, रेल्वे, विमानाचं बुकिंग, सिनेमाचं तिकीट यासारखी आर्थिक देवाणघेवाण करणं सहज शक्य आहे. पेटीएम कसे वापराल? प्लेस्टोअरवरुन पेटीएम अॅप डाऊनलोड करा किंवा पेटीएम.कॉम या वेबसाईटला जा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर तुम्हाला वनटाईम पासवर्ड मिळेल. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला मोबाईल प्रीपेड/पोस्टपेड, इलेक्ट्रिसिटी, डीटूएच, मूव्हीज, फ्लाईट, बस असे विविध पर्याय मिळतील. पेटीएमच्या अकाऊण्टमध्ये पैसे कसे भराल? 1. होमपेजवर 'अॅड मनी' या पर्यायावर क्लिक करा 2. किती रुपयांचा बॅलन्स टाकायचा आहे, ती रक्कम निवडा 3. 'अॅड मनी' क्लिक करा 4. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा 5. आवश्यक ते डिटेल्स (कार्ड नंबर, सीव्हीसी इ.) टाका 6. 'अॅड मनी' वर क्लिक केल्यावर पेटीएममध्ये बॅलन्स जमा होईल. मोबाईल रिचार्ज : मोबाईल रिचार्जवर क्लिक केल्यानंतर प्रीपेड आणि पोस्टपेड हे दोन पर्याय दिसतात. त्यातील योग्य तो पर्याय निवडल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाका. ऑपरेटर आणि रिचार्जची रक्कम टाकल्यानंतर प्रोसिड करा. इतरांना पैसे कसे पाठवावे? 1. होमपेजवर 'पे ऑर सेंड' या पर्यायावर क्लिक करा 2. 'सेंड टू बँक'वर क्लिक करा 3. अकाऊण्ट धारकाचं नाव, अकाऊण्ट नंबर, आयएफएससी कोड भरा 4. तुम्ही शंभर ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकाल (यासाठी काही रक्कम आकारली जाते) 5. 'सेंड' वर क्लिक केल्यास पैसे ट्रान्सफर होतील.पेझॅप
HDFC बँकधारकांना पेझॅप होम या अॅपवरुन पैसे ट्रान्सफर करता येतील. शॉपिंग, मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट यासारखे पर्यायही यावर उपलब्ध आहेत. पेझॅपच्या अकाऊण्टमध्ये पैसे कसे भराल? 1. 'सेंड मनी'वर क्लिक करा 2. 'अॅड मनी'वर क्लिक करुन व्हिसा क्रेडिट/डेबिट किंवा मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड निवडा. किंवा एचडीएफसीच्या लिंक्ड अकाऊण्टवर क्लिक करा 3. कार्ड नंबर, एक्स्पायरी, कार्डवरील नाव, सीव्हीसी नंबर, रक्कम यासारखे डिटेल्स भरा 4. 'अॅड मनी'वर क्लिक करा. 5. एसएमएसने आलेला वन टाईम पासवर्ड टाकून 'अॅड मनी' क्लिक करा इतरांना पैसे कसे पाठवावे? 1. 'सेंड मनी'वर क्लिक करुन मोबाईल हा पर्याय निवडा 2. नाव आणि मोबाईल नंबर टाका. किती रक्कम पाठवायची आहे ती लिहा 3. टाईपमध्ये पेमेंट सिलेक्ट करा 4. अॅड फेव्हरेट केल्यास हे डिटेल्स पुढील व्यवहारांसाठी सेव्ह होतात 5. 'सेंड मनी'वर क्लिक केल्यावर पैसे पाठवले जातील.यूपीआय :
जर तुम्हाला इतरांच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर त्याचा अकाऊंट नंबर विचारण्याची गरज नाही. तुम्ही केवळ तुमच्या स्मार्टफोनवरुन पैसे ट्रान्सफर करु शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय हे अॅप सुरु केलं आहे. या अॅपवरुन तुम्ही क्षणार्धात पैसे पाठवू शकाल. या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्जही करु शकाल. इतरांना पैसे कसे पाठवावे? 1. यूपीआय अॅप गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा 2. तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबरशी ते जोडा 3. तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा UPI ID (अॅप डाऊनलोड केल्यानंतर मिळेल) किंवा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल, तर तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल. 4. सध्या देशभरातील 21 बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे. 5. या अॅपद्वारे एका दिवसात 50 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करता येते.पॉकेट्स :
आयसीआयसीआय बँक धारकांना पॉकेट्स हे ई-वॉलेट उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून बिल भरणे, मोबाईल रिचार्ज, सिनेमाचे तिकीट, शॉपिंग यासोबत पैसे पाठवण्याचाही पर्याय आहे. इतकंच नाही, तर तुम्ही मित्रांडून पैसे मागूही (रिक्वेस्ट) शकता. नाव, पासवर्ड टाकून तुम्ही पॉकेट्सवर लॉगइन करता येतं. इतरांना पैसे कसे पाठवावे? 1. फंड ट्रान्सफरवर क्लिक करा 2. ज्याला पैसे पाठवायचे आहेत, तो ICICI धारक आहे की नाही, हे निवडा 3. नाव आणि अकाऊण्ट नंबर टाकून रक्कम लिहा. एम शॉप प्रिपेड मोबाईल रिचार्ज, डीटूएच रिचार्ज, सिनेमाचं तिकीट, शॉपिंग, बस किंवा विमान तिकीटअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement