एक्स्प्लोर

Harley Davidson चा भारतातील प्रवास संपला, कंपनी गाशा गुंडाळणार

हार्ले डेविडसन कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षात भारतातील आपला गाशा गुंडाळणारी हार्ले डेविडसन ही सातवी परदेशी ऑटो कंपनी आहे.

मुंबई : मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेच्या हार्ले डेविडसन कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता. भारतामधील उत्पादन आणि विक्री बंद करणं हे याच प्लॅनचा भाग आहे.

मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीत 22 टक्क्यांची घसरण झाली होती. अशा परिस्थितीत तोट्यात असलेले बाजार सोडून अमेरिकेतील आपल्या व्यवसायावर कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. 2019 मध्ये हार्ले डेविडसनने केवळ 2676 बाईकीची विक्री केली होती. इतकंच नाही तर यामध्येही 65 टक्के वाटा 750 सीसी बाईकचा आहे, ज्यांची असेम्ब्लिंग हरियाणातच केली जाते.

4 वर्षात 7 परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजाराला रामराम गेल्या चार वर्षात भारतातील आपला गाशा गुंडाळणारी हार्ले डेविडसन ही सातवी परदेशी ऑटो कंपनी आहे. याआधी जनरल मोटर्स, फिएट, Ssangyong, स्कॅनिया, MAN आणि UM Motorcycles या कंपन्यांनी भारतीय बाजाराला रामराम केला आहे.

10 वर्षात केवळ 27 हजार बाईकची विक्री हार्ले डेविडसनची बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते आणि भारतात मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे कंपनीने भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हार्ले डेविडसनने एक दशकापूर्वी भारतीय बाजारात प्रवेश केला होता. पण या दहा वर्षांत केवळ 27 हजार बाईकचीच विक्री झाली आहे. तर याच सेगमेंटमधील रॉयल एनफिल्ड ही कंपनी एका महिन्यात एवढ्या बाईकची विक्री करते.

70 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा? हार्लेच्या या निर्णयामुळे भारतातील कंपनीच्या जवळपास 70 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. तर कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक संजील राजशेखरन यांना कंपनीने सिंगापूरला ट्रान्सफर केलं आहे. तिथे ते आशियाचे प्रमुख अधिकारी म्हणून काम करणार आहेत.

हार्ले डेविडसनच्या एकूण विक्रीचा केवळ पाच टक्के भागच भारतीय बाजारातून येतो. सध्या हार्लेचा हरियाणामध्ये एक असेम्ब्ली प्लांट आहे. तसंच कंपनी पूर्णत: तयार बाईक भारतात आयातही करते. हरियाणामधील असेम्ब्ली प्लांट ऑगस्ट 2009 मध्ये सुरु करण्यात आला होता. इथेच कंपनीने आपली पहिली डीलरशिप नियुक्त केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget