एक्स्प्लोर
आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप
नवी दिल्ली : कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने केंद्र सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. लवकरच आधार कार्डच्या आधारे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. भारतीय ओळख प्राधिकरणाकडून लवकरच आधार एनेबल पेमेंट सिस्टीम (AEPS) हे अँड्रॉईड अॅप लाँच केलं जाणार आहे.
स्मार्टफोनवर युझर्सना हे मोबाईल अॅप मोफत डाऊनलोड करता येईल. हे अॅप विकसित करण्यासाठी सरकारने टीसीएसची मदत घेतली आहे. या अॅपवर आर्थिक व्यवहार कसल्याही पिन किंवा ओळखपत्राशिवाय करता येणार आहेत.
सर्व बँकांच्या ग्राहकांना हे अॅप उपलब्ध असेल. शिवाय बँकांना हे अॅप वापरण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहीतही करावं लागणार आहे.
नोटाबंदीनंतर स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या समितीने बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा अहवाल अर्थमंत्रालयाला दिला आहे. शिवाय फीचर फोनवर वापरण्यात येणाऱ्या यूएसएसडी या सिस्टीमच्या अपडेटचीही शिफारस समितीने केली आहे.
यूएसएसडीचा वापर इंटरनेटविना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी केला जातो. मात्र यामध्ये अनेक तांत्रिक बाबींची कमतरता असल्याने व्यवहार करताना तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे यूएसएसडीची नवी अपडेट 25 डिसेंबर रोजी मिळणार आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची दुसरी बैठक निती आयोगासोबत पार पडली. या बैठकीत कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
संबंधित बातम्या :
2000 रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाठी बिनधास्त स्वाईप करा, सेवा कर नाही!
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?
पेटीएम वॉलेट आता इंटरनेटशिवाय वापरता येणार, ऑफलाईन सेवा सुरु
इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल?
आता 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ओटीपीची गरज नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement