Google Play Store ने बदलला लोगो, जाणून घ्या कुठे झाला बदल
Google Play Store Logo Change : यापूर्वी गुगलने 2017 मध्ये गुगल प्ले स्टोअर डिझाइन केले होते, त्यावेळी कंपनीने लोगोमधून शॉपिंग बॅग काढून टाकली होती.
Google Play Store Logo Change : गुगल प्ले स्टोअरच्या लोगोमध्ये बदल झाला आहे. या बदलानंतर लोगोच्या रंगांमध्ये स्पष्ट फरक दिसून येत आहे. यापूर्वी गुगलने 2017 मध्ये गुगल प्ले स्टोअर डिझाइन केले होते, त्यावेळी कंपनीने लोगोमधून शॉपिंग बॅग काढून टाकली होती. यानंतर, गेल्या 5 आणि अधिक वर्षांमध्ये Google Play Store मध्ये कोणतेही मोठे बदल पाहिले गेले नाहीत. मात्र आता Google Play Store ने लोगोमध्ये बदल केला आहे.
बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल
जरी हा बदल सहज ओळखणे थोडे कठीण आहे, परंतु जेव्हा तुम्ही बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की Google Play Store च्या टॉपला एक कमी-रिझोल्यूशनचा नवीन लोगो आहे. जेव्हा तुम्ही जुन्या आणि नवीन लोगोची तुलना करता तेव्हा रंग आणि आकारात मोठा फरक असेल. या बदलाबद्दल बोलायचे झाले तर गुगल प्ले स्टोअरचे निळे आणि हिरवे रंग पूर्वीपेक्षा जास्त गडद दिसत आहेत. तर पिवळ्या आणि लाल रंगातही काही बदल करण्यात आले आहेत. त्याच वेळी, Google Play Store च्या त्रिकोणाचे कोपरे देखील पूर्वीपेक्षा अधिक गोलाकार दिसत आहेत.
बदल ओळखणे कठीण
गुगलने गुगल प्ले स्टोअरचा लोगो कधी बदलला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच गुगल प्ले स्टोअरमध्ये करण्यात आलेला हा बदल कायमस्वरूपी आहे की तात्पुरता हे स्पष्ट झालेले नाही. जर ते कायमस्वरूपी असेल तर ते आता उर्वरित अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर रोलआउट करणे सुरू होईल.