एक्स्प्लोर
युरोपियन युनियनकडून गुगलला तब्बल 17 हजार 400 कोटींचा दंड
मुंबई: युरोपियन युनियननं गुगल या जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनला तब्बल 17 हजार 400 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलनं आपल्या सर्च इंजिनमध्ये फेरफार केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्याता आला आहे.
गुगलनं सर्च इंजिनच्या रिझल्टमध्ये फेरफार करुन वापरकर्त्याला आपल्याच शॉपिंग सर्व्हिस प्रामुख्यानं दिसतील, अशी सोय केल्याचा ठपका युरोपियन युनियनच्या एका आयोगानं ठेवला आहे. त्यामुळे गुगल शॉपिंग सर्व्हिसच्या इतर स्पर्धक कंपन्या आपोआप मागे पडत असल्याचा दावाही केला गेला आहे.
मागच्या 7 वर्षांपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर हा दंड सुनावण्यात आला आहे. जगातील हा सर्वात मोठा दंड मानला जात आहे. याआधी 2009 साली अमेरिकेतील चिपमेकर कंपनी इंटेलला 1.6 अरब डॉलर इतका दंड केला गेला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement