(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google Employee Salary : गुगलच्या उच्च अधिकाऱ्यांचा पगार माहित आहे का?
Google CFO Salary : प्रत्येक व्यक्तीला लाखो डॉलर्समध्ये लक्ष्य मूल्यांसह स्टॉक पुरस्कार प्रदान केले गेले आहेत.
Google Salary Package : गूगल (Google) आपल्या चार सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे, त्यांचे मूळ वेतन 650,000 डॉलरवरून 1 दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. म्हणजे त्यांचे पॅकेज सुमारे चार कोटी 84 लाख रुपयांवरून सात कोटी 44 लाख रुपये झाले आहे. मुख्य वित्तीय अधिकारी रुथ पोराट, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर राघवन (गुगल सर्चचे प्रभारी), वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यवसाय अधिकारी फिलिप शिंडलर आणि केंट वॉकर, ग्लोबल अफेयर्सचे अध्यक्ष आणि मुख्य कायदेशीर अधिकारी यांनी यूएस सिक्युरिटीज आणि एक्सचेंजसाठी नवीन पॅकेजबाबत माहिती दिली.
गूगलने फाइलिंगमध्ये म्हटले की, ''कमिशन (SEC) नवीन कंपनी फाइलिंगमध्ये जानेवारी 2022 पासून प्रभावी, पोराट, राघवन, शिंडलर आणि वॉकर यांचे मूळ वेतन 650,000 डॉलरवरून एक दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवले जाईल." फाइलिंगनुसार, ''सर्व चार अधिकारी 2022 साठी गूगलच्या सामाजिक आणि पर्यावरणीय लक्ष्यांच्या कामगिरीच्या योगदानावर आधारित, वार्षिक दोन दशलक्ष डॉलरपर्यंत बोनस मिळवण्यासाठी पात्र असतील."
प्रत्येक व्यक्तीला लाखो डॉलर्समध्ये लक्ष्य मूल्यांसह स्टॉक पुरस्कार देण्यात आले आहेत. पोराट यांनी पाच दशलक्ष डॉलरच्या मूल्यांसह परफॉर्मन्स स्टॉक युनिट्सचा एक भाग ("PSUs") आणि 18 दशलक्ष डॉलरच्या प्रतिबंधित स्टॉक युनिट्सचा ("GSUs") एक भाग दिला जाईल. तर, राघवन यांना 12 दशलक्ष डॉलरच्या लक्ष्य मूल्यांसह PSUs चा एक भाग आणि 23दशलक्ष डॉलरच्या रकमेत GSU चा एक भाग दिला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट : शास्त्रज्ञांचा अंदाज
- Gujarat Gas Leak : सूरतमध्ये गॅस दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर
- Coronavirus : अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम, फक्त पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे : सीडीसी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha