एक्स्प्लोर

सुंदर पिचाईंकडे आता गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटची जबाबदारी

जगभरात माहिती पोहचवणाऱ्या गुगल या कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर आता आणखी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या सीईओपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कॅलिफोर्निया : गुगलने त्यांची पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी(सीईओ)सुंदर पिचाई यांची नियुक्ती केली आहे. गुगलचे सहसंस्थापक सेर्गेई ब्रिन यांच्याकडून आता सुंदर पिचाई हे कार्यभार स्वीकारणार आहेत. सुंदर पिचाई हे आधीच गुगलचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. तर, गुगलचे सह-संस्थापक. लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन आता सह-संस्थापक, भागधारक आणि अल्फाबेटचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. गुगलच्या महत्त्वाकांक्षी स्वयंचलित कार आणि लाईफ सायन्सेस क्षेत्रातील आगामी प्रकल्पांची जबाबदारी आता सुंदर पिचाई यांच्याकडे असणार आहे. गूगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन हे गुगल आणि अल्फाबेट कंपनीचे अध्यक्ष म्हणून राजीनामा देणार आहेत. दोघांनीही राजीनामा देण्यामागील कौटुंबिक जबाबदारी असल्याचे सांगितले. अल्फाबेट कंपनीमध्ये सुंदर पिचाई सेर्गेई ब्रिन आणि लॅरी पेजची जागा घेतील. अल्फाबेटद्वारे पिचाई दोन्ही कंपन्यांचे काम सांभाळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  2015 साली अल्फाबेटची स्थापना  अल्फाबेट ही कंपनी 2015 साली सर्व कंपन्यांची मूळ कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली आहे. गुगलपासून वेगळे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी आणि काही महत्त्वाचे प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी अल्फाबेटची सुरुवात करण्यात आली. पिचाई आता अल्फाबेट कंपनीच्या मंडाळाचेही सदस्य झाले आहेत. स्वयंचलित कार, लाईफ सायन्सेस, साइड वॉक लॅब्स, बलूनद्वारे ग्रामीण भागात इंटरनेट, अशा गुगलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर सुंदर पिचाई काम करणार आहेत. अलफाबेट कंपनी अलिकडच्या वर्षांत जगातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे. 2018 मध्ये कंपनीचा नफा सुमारे 30 अब्ज होता. तर महसूल 110 अब्ज डॉलर्स होता. पेज आणि सर्जे यांचे म्हणणे आहे की दोन्ही कंपन्या चालविण्यासाठी सुंदर पिचाई यांच्यापेक्षा चांगला माणूस दुसरा कोणी असू शकत नाही. पिचाई हे गेल्या 15 वर्षांपासून आमच्यासोबत काम करत आहेत. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचं शिक्षण खरगपूर आयआयटीमधून झालं आहे. त्यांचा जन्म चेन्नईत झाला. सुंदर पिचाई हे 2004 सालापासून गूगलशी जोडले गेले आहेत. पिचाई हे सीईओ या नात्याने गूगलमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि टेक्निकल स्ट्रॅटेजीचं दररोजचं काम पाहतात. संबंधित बातम्या : आता केवळ 3 दिवसात मोबाईल नंबर होणार पोर्ट 5 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंतचे कर्ज; शाओमी कंपनीची ऑफर Mumbai Police | गुन्हेगारांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांकडे नवं तंत्रज्ञान | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget