एक्स्प्लोर

तुम्ही मरणार कधी? गुगलने अचंबित करणारा शोध लावला!

अंथरुणाला खिळलेला किंवा उपचार घेत असलेला पेशंटची प्राणज्योत कधी मालवू शकेल, हे सांगणारं सॉफ्टवेअर गुगलने विकसित केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे.

मंबई: मानवाच्या उत्क्रांतीपासून सुरु असलेले नवनवे संशोधन, माणसाचा मृत्यू कधी होणार याचा शोध घेण्यापर्यंत सुरुच आहेत. आजच्या जगात तर अनेक अचंबित करणारे शोध लागत आहे. असंच एक विस्मयकारी संशोधन गुगलने केलं आहे. माणूस कधी मरणार, हे आता समजणं शक्य होणार आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या क्रिश या सिनेमात ज्याप्रमाणे माणसाचं भविष्य किंवा मरण कळत होतं, तसंच काहीसं गुगलने शोधलं आहे. काय आहे गुगलचं विस्मयकारी संशोधन? अंथरुणाला खिळलेला किंवा उपचार घेत असलेला पेशंटची प्राणज्योत कधी मालवू शकेल, हे सांगणारं सॉफ्टवेअर गुगलने विकसित केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे. याबाबतचा एक प्रयोग गुगलने यशस्वी केला असून त्याचा रिपोर्ट नुकतंच प्रसिद्ध झाला आहे. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेट याबाबतचा संशोधन प्रकल्प राबवत आहे. गुगलच्या या संशोधनाला यश मिळालं तर विज्ञानक्षेत्रासाठी हा शोध मैलाचा दगड ठरेल. गुगलला यापुढे जाऊन मृत्यूचे लक्षण आणि आजार या बाबतचा अचूक अंदाज बांधायचा आहे. पेशंटची माहिती गुगलची मेडिकल 'ब्रेन टीम' कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (artificial intelligence) सहाय्याने हे खास सॉफ्टवेअर विकसित करत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये पेशंटची सर्व माहिती भरली जाते. पेशंटच्या मेडिकल टेस्ट, त्याचा आजारपणाचा माहिती, डॉक्टरांचा सर्व तपशील, अशी सर्व माहिती भरली जाते. या माहितीच्या आधारे गुगल विश्लेषण करून त्या पेशंटच्या मृत्यूचा कालावधी काय असेल त्याचा अंदाज बांधणार आहे. महिलेवर प्रयोग या संशोधनाचा प्रयोग एका कॅन्सरग्रस्त महिलेवर करण्यात आला. या महिलेला स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर उपचार केले. त्यानंतर गुगलनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर महिलेची जगण्याची शक्यता 19.9 टक्के असल्याचं सांगितलं आणि 10 दिवसातच त्या महिलेचा मृत्यू झाला. स्टॅनफोर्ड युनव्हर्सिटीच्या मदतीनं गुगल हा प्रकल्प राबवत आहे. हा प्रयोग सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. अधिकच्या संशोधनानंतर याचा पूर्ण वापर करता येईल. गुगलची प्रगती गुगलने इतर तंत्रज्ञानापेक्षा इतक्या जलद अशाप्रकारचे संशोधन केल्याने वैद्यकीय तज्ज्ञसुद्धा अचंबित झाले आहे. अनेक रुग्णालय आणि डॉक्टरांनी अनेक चांगल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण ही सर्व उपकरणे महाग आणि वेळ खाऊ आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणताही दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र गुगल याचा कोणतही दुरुपयोग कधीही होऊ देणार नाही असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget