एक्स्प्लोर
स्मार्टफोनऐवजी पुजेच्या पादुका हातात, फोन शॉपिंगवरुन तरुणाला गंडा
रायपूर (छत्तीसगड): अवघ्या 3500 रुपयात ब्रॅण्डेड कंपनीचा मोबाइल मिळविण्याचा नादात एका तरुणाला गंडा घातल्याची घटना छत्तीसगडमध्ये समोर आली आहे.
पार्सल आलेल्या बॉक्समधून मोबाइलऐवजी पुजेच्या पादुका आणि पूजेचं साहित्य तरुणाच्या हातात पडलं आहे. संजय पांडे या तरुणाला ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे.
15 मेला संजयच्या वडिलांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आले. आपण दिल्लीतील करोलबागमधून एका ब्रॅण्डेड मोबाइल कंपनीकडून बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीनं त्याला सांगितलं. मार्केटमध्ये 8 ते 10 हजारांना मिळणारा स्मार्टफोन तुम्हाला अवघ्या 3500 रु. एका स्पेशल ऑफरमध्ये मिळेल असं सांगण्यात आलं.
स्वस्तात चांगला मोबाइल मिळत असल्यानं संजयनं मोबाइलवरच त्याची ऑर्डरही दिली. 26 मेला पार्सल देखील आलं. त्याचा मेसेजही संजयला मोबाइलवर मिळाला. संजयनं पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं पार्सल 3500 रु. देऊन घेतलही.
पण तिथेच ते पार्सल खोलून पाहिल्यावर संजयला धक्काच बसला. कारण की, मोबाइलऐवजी त्यामध्ये पुजेच्या पादुका आणि पूजासामुग्री होती. युवकनं याबद्दल पोस्ट ऑफिसात विचारणाही केली. पण पार्सल काय येतं हे आम्ही पाहात नाही. असं उत्तर त्याला मिळालं. त्यानंतर त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिथं त्यानं तक्रारही नोंदवली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement