एक्स्प्लोर
फोर्डची ड्रायव्हरलेस कार 2021 पर्यंत बाजारात

मुंबई: फोर्ड या अमेरिकन कंपनीने 2021पर्यंत विनाचालक कार बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली आहे. या कारमध्ये राईड हॅण्डलिंग आणि राईड शेअरिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
कंपनीने यासाठी चार ऑटोनॉमस व्हेईकल डेव्हलपमेंट स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या सिलिकॉन व्हॉली आणि पॉली ऑल्टो कॅम्पसच्या टीमचाही विस्तार केला आहे.
विनाचालक कारसाठी कंपनी गेल्या दशकभरापासून संशोधन करत आहे. या तंत्रज्ञानाची पहिली कार 2021पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही कार, कमर्शिअल मोबिलिटी सर्व्हिसेसच्या राईड शेअरिंग आणि राईड हॅण्डलिंगसारख्या तंत्रज्ञानाने युक्त असणार आहे.
कंपनीचे प्रोडक्ट डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह आणि उपाध्यक्ष राज नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांपासून कंपनी कार क्षेत्रात नवी तंत्रज्ञान आणण्यासाठी संशोधन करत आहे. यासाठी कंपनीने सॉफ्टवेअस तसेच सेंसिंग टेक्नॉलॉजी विकसित केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
