एक्स्प्लोर
नवी गाडी सांगून जुनी स्कॉर्पिओ विकली, आनंद महिंद्रांसह तिघांवर गुन्हा

अहमदनगर : महिंद्रा कंपनीचे मालक आणि महिंद्रा शोरुम मालकासह तिघांवर अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकाला नवी गाडी सांगून जुनी स्कॉर्पिओ गाडी विकल्याचा आरोप आहे.
अहमदनगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात आनंद महिंद्रा, शोरुम मालक कमल सबलोक आणि बाबासाहेब दारकुंडेवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी ग्राहक सोनल निकम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. शोरुम चालकाला फसवणूक प्रकरणी जाब विचारल्यानंतर दमबाजी केल्याचं त्यांनी म्हटलं.
न्यायालयाच्या आदेशानं एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कंपनी आणि शोरुमशी पत्र-व्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नसल्याचं तक्रारदारानं म्हटलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























