एक्स्प्लोर
लॉग आऊट केल्यानंतरही फेसबुकची तुमच्यावर नजर?

नवी दिल्ली : लॉग आऊट केल्यानंतरही फेसबुक युझरला ट्रॅक करत असल्याचे आरोप अनेकदा लावण्यात आले आहेत. मात्र आता फेसबुकवर यामुळे खटला दाखल करण्यात आल्याचं वृत्त 'द गार्डियन'ने दिलं आहे.
इतर वेबसाईट्सवर ब्राऊजिंग करत असताना फेसबुक लाईक्सचे पर्याय दिले जातात. या लाईक बटणच्या माध्यमातूनच फेसबुककडून ब्राऊजिंग हिस्ट्री ट्रॅक केली जाते. अमेरिकेच्या फेडरल आणि स्टेट प्रायव्हसी कायद्याचं हे उल्लंघन आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
दरम्यान सबळ पुराव्याअभावी ही याचिका फेटाळण्यात आली आहे. युझर्सना या ट्रॅकिंगमुळे नुकसान झाल्याचं किंवा फेसबुककडून ट्रॅकिंग केली जात असल्याचं सिद्ध करण्यात याचिकाकर्त्याला अपयश आलं.
फेसबुकवर दाखल करण्यात आलेला हा खटला पाच वर्षे जुना असून यापूर्वीही न्यायालयाने ही याचिका अनेकदा फेटाळली आहे. लॉग आऊट केल्यानंतरही फेसबुककडून ट्रॅकिंग केली जाते, असं 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी ब्लॉगर निक क्यूरिलॉविक यांच्या निदर्शनास आलं होतं.
सुरक्षा कारणांसाठी फेसबुककडे कुकीज स्टोअर्स असतात. यामुळे कुणीही फेसबुक अकाऊंट हॅक करु शकत नाही. मात्र फेसबुक या माहितीचा वापर थर्ड पार्टीला विकण्यासाठी करत नाही, असं स्पष्टीकरण फेसबुकचे इंजिनिअर ग्रेग स्टेफनिक यांनी 'द गार्डियन'शी बोलताना दिलं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पर्सनल फायनान्स
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement


















