एक्स्प्लोर

फेसबुककडून Libra क्रिप्टोकरन्सीची घोषणा, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरवरुनही पैसे पाठवता येणार

Libra चा वापर करुन व्यवहार करणे हे एखादा मेसेज पाठवण्याइतके हे सोपे असणार आहे, असा दावा फेसबुक करत आहे.

सोशल मिडीयातील सर्वात लोकप्रिय कंपनी फेसबुकने आपल्या 'क्रिप्टोकरन्सी'ची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत अंदाज लावले जात होते. Libra असं नाव या क्रिप्टोकरन्सीला देण्यात आलं आहे. या क्रिप्टोकरन्सीमुळे जगभरात डिजीटल पेमेंटची परिभाषा बदलू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. Libra ही करन्सी वापरुन एखाद्याला पैसे पाठवताना किंवा स्विकारताना कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. पुढच्या वर्षापर्यंत ही पेमेंट सिस्टीम सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी फेसबुकने Calibra या डिजीटल वॅलेटचीही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरवरही याद्वारे व्यवहार करता येणार आहे. 'लिब्रा' या क्रिप्टोकरन्सीचे मुल्य स्थिर असेल असे सांगण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सी प्रमाणे याचे मुल्य अस्थिर नसणार आहे. फेसबुककडून Libra क्रिप्टोकरन्सीची घोषणा, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरवरुनही पैसे पाठवता येणार या क्रिप्टोकरन्सीचे मुल्य स्थिर ठेवण्यासाठी Libra Reserve ची स्थापना करण्यात येणार आहे. ज्याची देखरेख Libra Association द्वारे करण्यात येणार आहे ज्यामध्ये आतापर्यंत 28 कंपन्यांनी नोंद केलेली आहे. नोंद करणाऱ्या  प्रत्येक संघटनेने यात 1 कोटी डॉलरची गुंतवणुक केलेली आहे. पुढच्या वर्षीपर्यंत यामध्ये जवळपास 100 कंपन्या असतील असं फेसबुककडून सांगण्यात येत आहे.  Libra Association चे सदस्य असलेल्या मास्टर कार्ड, पेपल, वीजा, स्पॉटिफाय, स्ट्राइप यांच्यासह 28 कंपन्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर लिब्रा करन्सी स्विकारली जाणार आहे. या करन्सीचा वापर मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट, कॅब बुकिंग यासह इतर ऑनलाईन पेमेंटसाठी करता येणार आहे. फेसबुककडून Libra क्रिप्टोकरन्सीची घोषणा, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरवरुनही पैसे पाठवता येणार फेसबुकच्या सोशल मिडीया नेटवर्कचा आणि कॅलिब्राचा काहीही संबंध नसणार आहे, असं फेसबुककडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे फेसबुकवरील आर्थिक आणि सोशल माहिती पुर्णपणे वेगळी असणार, असा दावा फेसबुकने केला आहे. क्रिप्टोकरन्सीचे सगळे फायदे लिब्राला मिळणार आहे. एखाद्याला पैसे पाठवणे किंवा एखाद्याकडून पैसे स्विकारणे, सुरक्षित व्यवहार, परदेशात पैसे पाठवणे हे क्रिप्टोकरन्सीचे फायदे लिब्रालाही असणार आहेत. लिब्राचा वापर करुन व्यवहार करणे हे एखादा मेसेज पाठवण्याइतके हे सोपे असणार आहे, असा दावा फेसबुक करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget