एक्स्प्लोर
Advertisement
ही इमोजी तुम्हीही वापरता?
मुंबई: व्हॉट्सअॅपवर चॅट करताना आपण वेगवेगळ्या इमोजी फॉरवर्ड करतो. जोक्सना रिप्लाय करताना हसून हसून डोळ्यातून पाणी आलं अशा अर्थाची इमोजी पाठवली जाते. तुम्हीही अशी इमोजी पाठवता?
जर त्याचं उत्तर हो असेल, तर अशी इमोजी पाठवणारे तुम्ही एकटेच नाहीत. एका रिचर्सनुसार ‘फेस विथ टियर्स ऑफ जॉय’ इमोजी ही आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय इमोजी आहे.
सर्वाधिक भावलेली इमोजी
रिसर्चनुसार युझर्सना मोठ्या प्रमाणात ‘फेस विथ टियर्स ऑफ जॉय’ ही इमोजी सर्वाधिक भावली. इतकंच नाही तर हार्ट इमोजीला पसंती देणाऱ्या रोमँटिक फ्रान्सलामध्येही हीच इमोजी लोकप्रिय आहे.
हा सर्व्हे सुमारे दोनशे देशातील सुमारे 40 लाख स्मार्टफोन्सवरील 40 कोटी मेसेजद्वारे करण्यात आला.
अमेरिकेच्या मिशिगन आणि चीनच्या पेकिंग विद्यापिठातील अभ्यासकांनी याबाबत सर्वेक्षण केलं. ‘फेस विथ टियर्स ऑफ जॉय’ ही इमोजी जगभरात वापरली जाते. विविध भाषा, प्रांत, संस्कृतीमध्ये या इमोजीचा वापर होतो. त्यामुळे देश-प्रांत वेगवेगळा असला तरी जगभरात भावना सारख्याच असतात.
कसा झाला रिसर्च?
या रिसर्चसाठी संशोधकांनी किका इमोजी की-बोर्डचा वापर केला. हा की बोर्ड 60 भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा इमोजीवर केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठी रिसर्च आहे.
रिसर्चचे निष्कर्ष -
हसून हसून रडणारा चेहरा अशी इमोजी ही सर्वात लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला. त्यानंतर हार्ट इमोजी आणि हार्ट आईज इमोजीचा नंबर लागतो.
प्रत्येक मेसेजमध्ये एक इमोजी -
रिसर्चनुसार फ्रान्समधील लोक सर्वाधिक इमोजीचा वापर करतात. अमेरिका आणि रशियातील 20 टक्के लोक प्रत्येक मेसेजमध्ये किमान एक इमोजी वापरतातच, असाही निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
कोणत्या देशात 'हॅप्पी इमोजी'चा वापर?
व्हॉट्सअॅपवर लोक कल्चर आणि प्रेफरंसनुसारही इमोजीचा वापर करतात. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चेक रिपब्लिकचे लोक साधारणत: 'हॅप्पी इमोजी' वापरतात. तर फ्रान्स, हंगेरी आणि युक्रेनमध्ये नेगेटिव्ह इमोजीचाही वापर करतात.
नेगेटिव्ह इमोजी
मेक्सिको, कोलंबिया, चिली आणि अर्जेंटिनाचे लोक, आपल्या प्रवृत्तीनुसार पॉजिटिव्ह इमोजीचा वापर करतात. तर तुर्की आणि रशियात नेगेटिव्ह इमोजी सर्वाधिक वापरली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement