एक्स्प्लोर
वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक
डेटा घाटोळ्यानंतर लाखो युझर्सनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे.
मुंबई :फेसबुकच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे कंपनी आधीपासूनच वादात आहे. आता व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी फेसबुक डिलीट करा, असं म्हटलं आहे.
ब्रायन अॅक्टन यांनी ट्वीट केलं आहे की, “इट इज टाइम #deletefacebook.” अॅक्टन यांचं ट्विटर हॅण्डल व्हेरिफाईड नाही. त्यांचे सुमारे 23 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हे त्यांचं खासगी अकाऊंट आहे आणि ते कधीतरीच ट्वीट करतात हे फॉलोअर्सना माहित आहे. पण त्यांनी फेसबुक डिलीट करण्यास का सांगितलं आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने जेन कॉम आणि ब्रायन अॅक्टन यांच्याकडून 2014 मध्ये 16 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं होतं. जेन कॉम अजूनही कंपनीसोबत काम करत असून, अॅक्टन यांनी स्वत:ची संस्था सुरु केली आहे. फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’ डेटा घाटोळ्यानंतर लाखो युझर्सनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे. अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे. सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे. काय आहे प्रकरण? 2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे. ब्रिटनस्थित केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले आहे. एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. संबंधित बातम्या 'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’ फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसानIt is time. #deletefacebook
— Brian Acton (@brianacton) March 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement