एक्स्प्लोर
फेसबुक डिलीट करा, व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांचे आवाहन
फेसबुकच्या माध्यमातून यूजर्सवर पाळत ठेवली जात आहे. म्ही कंपनी विकली फेसबुक कंपनीला अधिकार दिले. आपण त्यांची उत्पादने विकत घेतो. फेसबुकवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींवर आपण क्लीक करतो आणि थोड्याच वेळात फेसबुक पोस्ट डिलीट करते, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी पुन्हा एकदा फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे आवाहन यूजर्सना केले आहे. यूजर प्रायव्हसी लीक झाल्याच्या आरोपामुळे फेसबुकला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी देखील मार्च महिन्यात फेसबुक डिलीट करण्याचे त्यांनी आवाहन केलं होत.
फेसबुक डिलीट करण्याच्या निर्णयावर मी ठाम असून जास्तीत जास्त लोकांना फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन देखील कऱणार असल्याच ब्रेन अॅक्टन म्हणाले. तुम्हाला फेसबुकची आवड आहे आणि फेसबुकवर येणाऱ्या जाहिरांतीवर तुम्ही खुश आहात तर तुम्ही फेसबुक सुरु ठेवू शकतात, असेही ते म्हणाले.
मार्च महिन्यात व्हॉट्सअॅपने फेसबुकसोबतचे आपले मतभेद जाहीरपणे स्वीकार केल्यानंतर पहिल्यांदा अॅक्टन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर फेसबुक डिलीट करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी मार्क झुकरबर्ग यांना व्हॉट्सअॅप का विकले? याची कारणे देखील सांगितली होती.
अॅक्टन म्हणाले, आम्ही कंपनी विकली फेसबुक कंपनीला अधिकार दिले. आपण त्यांची उत्पादने विकत घेतो. फेसबुकवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींवर आपण क्लीक करतो आणि थोड्याच वेळात फेसबुक पोस्ट डिलीट करते, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे.
व्हॉट्सअॅपचे फेसबुकसोबत काही मतभेद होते, त्यामुळे अॅक्टन यांनी कंपनी सोडली होती. 85 लाख डॉलरवर देखील त्यांनी पाणी सोडले होते, असे अॅक्टन फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
व्हॉट्सअॅपकडून इस्राईलच्या ‘एनएसओ’कंपनीवर खटला
भारतातील अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप फेसबुकच्या इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने केला आहे. सायबर हेरगेरीचा हा प्रकार असून या संबधी व्हॉट्सअॅपने इस्त्रायलच्या ‘एनएसओ या तंत्रज्ञान समूहावर हा खटला भरला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
जळगाव
भविष्य
Advertisement