एक्स्प्लोर
सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक
नवी दिल्ली : फ्रिडम 251 हा स्वस्त स्मार्टफोन बनवणारी कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे. रिंगिंग बेल या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पैसे घेऊन फोन न दिल्याचा या कंपनीवर आरोप आहे.
गाझियाबादच्या सिंहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये रिंगिंग बेल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने व्यवसायिकांशी स्वस्त मोबाईल देण्याचा करार केला. मात्र फोनही नाही आणि पैसेही मिळाले नाही, असं तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांना ताब्यात घेतलं आहे. वितरकांशी पैशांसंबंधित बोलणं झालं आहे आणि लवकरच पैसे परत दिले जातील, असं गोयल यांनी सांगितलं.
251 रुपयात सर्वात स्वस्त स्मार्टफोन देऊ असं म्हणत ही कंपनी जोरदार चर्चेत आली होती. कंपनीच्या वेबसाईटवरुन साडे सात कोटी ग्राहकांनी फोनची बुकिंग केली होती. पण सध्या ही कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे.
संबंधित बातम्या :
रिंगिंग बेल्सची ऑफर, लॉयल्टी कार्डवर फ्रीडम 251 स्मार्टफोन मोफत!
आधी 251 रुपयाला स्मार्टफोन, आता 9900 चा LED, रिंगिंग बेल्सचा धमाका
सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 उद्यापासून ग्राहकांच्या हाती!
251 रुपयांच्या स्मार्टफोनचा पहिला लूक रिलीज
251 रुपयांत स्मार्टफोन देणाऱ्या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
खुशखबर: रु. 251 किंमतीच्या स्मार्टफोनची वेबसाइट पुन्हा सुरु!
या कारणांमुळे 251 रुपयांचा मोबाईल घेणं टाळावं?
अखेर 251 रुपयांच्या 'फ्रीडम' स्मार्टफोनच्या विक्रीचा मुहूर्त ठरला!
251 रुपयांचा स्मार्टफोन देणाऱ्या कंपनीला कोर्टाचा दिलासा!
सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251, आता कॅश ऑन डिलिव्हरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement