एक्स्प्लोर
मोबाईल अॅपद्वारे चीनकडून लष्करी अधिकाऱ्यांचा डेटा चोरी
चीनने आपल्या देशात तयार झालेल्या मोबाईल अॅपला अस्त्र बनवलं आहे. ज्या माध्यमातून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी केला जात आहे.

प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली : डोकलाम वादावर तोंडफोड झाल्यानंतर चीनकडून भारताविरोधात नवी खेळी सुरु आहे. यावेळी चीनने आपल्या देशात तयार झालेल्या मोबाईल अॅपला अस्त्र बनवलं आहे. ज्या माध्यमातून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी केला जात आहे. याबाबतचा एक अहवाल नुकताच आयबीकडून देण्यात आला आहे. आयबीने दिलेल्या अहवालानुसार, ट्रूकॉलर, UC ब्राउजर, शेअर-इट, क्लीन मास्टरसारख्या 42 मोबाईल अॅपवरुन भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांची गुप्त माहिती चीनच्या सर्व्हरवर संकलित केली जात आहे. या संकलित माहितीद्वारे चीन भारताविरोधात नवीन षडयंत्र रचण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच गूगल प्ले स्टोअर्सवरुनही अलिबाबा या चिनी कंपनीचं मोबाईल अॅप UC ब्राउजर अनिश्चित काळासाठी हटवण्यात आलं होतं. UC ब्राउजरवरील डेटा सुरक्षित नसल्याचा आरोप करत गूगल प्ले स्टोअर्सने ही कारवाई केली होती. त्यामुळे चीनच्या चोरीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण, डोकलाम वादावर तोंडफोड झाल्यानंतर चीनचा पोटशूळ उठला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत






















