एक्स्प्लोर
चीनचा भन्नाट शोध, रस्त्यावरील लाईटसाठी चक्क मानवनिर्मित चंद्राची निर्मिती
स्ट्रीट लाईट अर्थात रस्त्यावरील वीजेचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी चीनने भन्नाट आयडिया शोधली आहे. आपण विचारही करु शकणार नाही, अशी तयारी चीनने केली आहे.
बीजिंग: भारताचा शेजारील देश चीन कोणता शोध लावेल हे सांगता येत नाही. सुईपासून विमानापर्यंत, चायनीज फटाक्यांपासून ते घड्याळ-मोबाईलपर्यंत सगळीकडे चीनचा बोलबाला आहे. आता चीनने त्यापुढे मजल मारली आहे. स्ट्रीट लाईट अर्थात रस्त्यावरील वीजेचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी चीनने भन्नाट आयडिया शोधली आहे. आपण विचारही करु शकणार नाही, अशी तयारी चीनने केली आहे.
स्ट्रीट लाईट हद्दपार करण्यासाठी चीनने चक्क तीन कृत्रिम चंद्र बनवण्याची तयारी केली आहे. 2020 पर्यंत चीन तीन आर्टिफिशियल मून अर्थात मानवनिर्मित चंद्र लाँच करणार आहे. चीनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतची माहिती देणाऱ्या एका दैनिकाने हे वृत्त दिलं आहे.
मानवनिर्मित चंद्र कसे काम करतील?
मानवनिर्मित चंद्र हा एकप्रकारचा सॅटेलाईट आहे, त्यामध्ये भले मोठे आरसे असतील, जे सूर्यकिरणं पृथ्वीवर परावर्तित करतील. हे चंद्र 2020 पर्यंत चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू इथे जमिनीपासून 80 किमी उंचीवर स्थिरावले जातील. जमिनीपासूनचं अंतर कमी असल्याने मानवनिर्मित चंद्र हे खऱ्याखुऱ्या चंद्रापेक्षा 8 पट जास्त प्रकाशित असतील.
त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे वीजेचे खांब उभारावे लागतात, ती समस्याच दूर होईल. रस्त्यावर प्रकाश देण्याचं काम हे मानवनिर्मित चंद्र करतील. मानवनिर्मित चंद्रामुळे 80 किमी परिसरात प्रकाश पडेल. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रोजेक्टचं काम सुरु असून, ते आता अंतिम टप्प्यात आहे.
दुसरीकडे आर्टिफिशियल मून अर्थात मानवनिर्मित चंद्राच्या दुष्परिणामाची चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. या चंद्राच्या प्रकाशाने जनावरांवर परिणाम होईल, तसंच खगोलीय घटना पाहण्यात अडथळे येतील असा अंदाज आहे. मात्र हर्बिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक कांग वीमिन यांच्या मते, आर्टिफिशियल मून एकदम चमकदार नसले. थोडा अंधुक प्रकाश देईल.
दरम्यान, प्रकाशासाठी माणसाने आकाशात सोडलेल्या प्रक्षेपकांचा हा पहिलाच प्रयोग नाही. याबाबतचे अनेक प्रयोग फसले आहेत. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे 2017 मध्ये रशियाने हा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement