लॉकडाऊनमुळे कार बाजारातील स्थिरता दूर करण्यासाठी कंपन्यांच्या भन्नाट ऑफर्स!
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिकचक्र थांबली आहेत. अशातच कार बाजारात आलेली स्थिरता दूर करण्यासाठी कार कंपन्यांनी वेळवेगल्या ऑफर दिल्या आहेत. टाटा कंपनीने तर 5 हजारांचा चेक घेऊन या आणि 5 लाख पर्यंतची कार घेऊन जा अशी ऑफर दिली आहे.
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कार बाजारात आलेली स्थिरता दूर करण्यासाठी कार कंपन्यांनी वेळवेगल्या ऑफर दिल्या आहेत. टाटा कंपनीने तर 5 हजारांचा चेक घेऊन या आणि 5 लाख पर्यंतची कार घेऊन जा अशी ऑफर दिली आहे. कोरोनाच्या योध्यांनाही गाडी खरेदीसाठी विशेष सूट दिली गेली आहे. गाडी खरेदी करण्याचं स्वप्न बाळगत असाल तर ही बातमी जरूर वाचा...
5 हजारांचा चेक घेऊन या आणि 5 लाख किमतीची चार चाकी गाडी घरी घेऊन जा. ही ऑफर आहे टाटा कंपनीची. कोरोनामुळे कार बाजारात आलेली स्थिरता दूर करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. टाटा कंपनीने केवळ 5 लाख पर्यंतच्या कारच नाही तर इतर कारला देखील ऑनरोड किमतीच कर्ज देण्याची सुविधा दिली आहे. पूर्वी कारचा हप्ता 5 वर्षांचा असायचा त्यामुळे ग्राहकांना महिन्याचा इएमआय हा जास्त भरावा लागत असे आता ग्राहकांना मंथली इएमआय कमी व्हावा यासाठी गाडीच कर्ज 8 वर्षांपर्यंत फेडता येईल, अशी नवी योजनेची ऑफर दिली आहे.
औरंगाबादेतील टाटा शोरूमचे मालक सचिन मुळे यांनी सांगितलं की टाटाची गाडी खरेदी केल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांसाठी केवळ पाच हजार रुपयांचा हप्ता देण्यात आला आहे. सहा महिन्यानंतर तुमचा हप्ता वाढवण्यात येईल. सहा महिन्यानंतर आपल्याला जर गाडीचा हप्ता भरणं शक्य नसेल तर ती गाडी देखील परत घेण्याची स्कीम टाटाकडून देण्यात आली आहे. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या कोविड योध्याना जसे डॉक्टर, पोलीस, आरोग्य विभागाने कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या योध्याना ही 45 पर्यंतची विशेष सूट देण्यात आली आहे. मात्र ही योजना टाटांच्या नवीन hatch back ऑट्रोझ या गाड्याना लागू नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी करतील आणि सोशल डिस्टन्सिगमुळे छोट्या गाड्यांना प्राधान्य देतील आता कार कंपन्यांचा अभ्यास आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत छोट्या कार पोहोचाव्यात यासाठी ही नवीन योजना सुरू केली असल्याचेही मुळे यांनी सांगितले आहे.
केवळ टाटाच नाही तर मारुती सुझुकीने देखील कार खरेदी करणाऱ्यांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या आहेत. या ऑफर विषयी सांगताना पगारिया ऑटोचे राहुल पगारे यांनी सांगितलं की, मारुती सुझुकीच्या गाड्या खरेदी करण्याचा आपण विचार करत असाल तर त्यांच्याकडून हवा तो हप्ता अशी नवी स्कीम सुरू करण्यात आली आहे.
बरं या नव्या ऑफरचा फायदा ग्राहकांना होणार आहे की, अधिकच व्याज हे ग्राहकांच्या माथी पडणार आहेत. हेदेखील आम्ही जाणून घेतलं याबद्दल बँकिंग तज्ञ आणि ग्राहकांची ही प्रतिक्रिया जाऊन घेतली. देविदास तुळजापूर बँकिंग तज्ञ यांच्यामते कार बाजारामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे लोकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या नव्या योजना कंपन्या आणू पहात आहे. आता या योजना ग्राहकांच्या पसंतीत किती उतरतात? कोरोनाच्या संकटामुळे आलेली कार बाजारातील मंदिला दूर करण्यासाठी किती यशस्वी होतात, याचे उत्तर येणारा काळच देईल. पण कार बाजारातली स्थिरता दूर करण्यासाठी कार कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे मात्र नक्की. त्यामुळे गाडी खरेदी करण्याचा विचार करतात तर या स्कीमचा विचार करायला काही हरकत नाही.
संबंधित बातम्या :
परभणीत जुगार खेळणारे बारा प्रतिष्ठित व्यापारी अटकेत; भाजप नगरसेविकेच्या पुत्राचाही समावेश
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी, तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?