एक्स्प्लोर
एटीएमबाहेर रांगा लावण्यासाठी 'बुकमायछोटू.कॉम'चा आधार
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात बँका आणि एटीएमसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रांगेत नंबर लावण्यासाठी काही जण इतरांना उभं करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच 'बुकमायछोटू.कॉम' या सेवेच्या माध्यमातून काही जण एका तासासाठी हेल्पर बुक करत आहेत.
घरकामात मदत घेणाऱ्या पोरांना 'छोटू' असं संबोधलं जातं. 'बुक माय छोटू' या वेबसाईटच्या माध्यमातून असे घरकामात मदत करणारे छोटू उपलब्ध करुन दिले जात आहेत. 90 रुपये एक तासाच्या हिशेबाने 'छोटू' उपलब्ध करुन दिले जातात. साफसफाई, शिफ्टिंग, बिलं भरणं अशा कामांसाठी ही पोरं तासाच्या हिशेबाने बोलावली जातात. मात्र आता या छोटूंचा वापर आता एटीएममध्ये रांगेत उभं राहण्यासाठी केला जात आहे.
छोटू काय करतात?
एटीएम किंवा बँकेसमोर रांगेत उभं राहण्यासाठी तासाच्या दरानुसार छोटू उपलब्ध करुन दिले जातात. हे छोटू फक्त रांगेत उभं राहण्याचं काम करतात, अर्थात तुमचा नंबर लावून ठेवतात. एटीएम किंवा बँकेच्या रांगेत तुमचा नंबर जवळ आला की तुम्हाला फोन केला जातो. मग तुम्ही छोटूच्या जागी प्रत्यक्ष उभं राहायचं असतं. थोडक्यात बँक किंवा एटीएमचे प्रत्यक्ष व्यवहार तुम्हालाच करायचे असतात.
छोटू या नावातूनच ही हेल्पर सेवा असल्याचं समजतं, असं कंपनीचे फाऊंडर सतजीत सिंह सांगतात. 'पूर्वी घरची कामं करण्यासाठी अनेक जण छोटू बुक करायचे, नोटाबंदीच्या काळात मात्र रांगेत उभं राहण्यासाठी बुकिंग होत आहे. कंपनीकडून हेल्पर्सचं व्यवस्थित व्हेरिफिकेशन केलं जातं. ग्राहकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही पडताळणी करतो' असंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement