एक्स्प्लोर

BMW Bike Launch : भारतात BMWने लॉन्च केल्या शानदार बाईक्स; क्लासी फिचर्स अन् बरचं काही...

BMW Bike Launch : भारतात BMWने शानदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत. आता या बाईक्सची थेट स्पर्धा डुकाटीच्या बाईक्ससोबत होणार आहे.

मुंबई : BMW Motorrad ने भारतात आपली नवी बाईक R 1250 GS BS 6 अॅडवेंचर लॉन्च केली आहे. कंपनीने दोन ट्रिम्समध्ये बाजारात लॉन्च केलं आहे. ज्यामध्ये R 1250 GS आणि R 1250 GS Adventure यांचा समावेश आहे. कंपनीने या बाईक्सची प्री-बुकिंग आधीच सुरु केली होती.  BMW Motorrad च्या R 1250 GS आणि R 1250 GS अॅडवेंचरला फक्त Pro व्हेरियंटमध्ये अवेलेबल करण्यात आलं आहे. R 1250 GS Pro ची किंमत 20.45 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर R 1250 GS Adventure Pro ची किंमत 22.4 लाख रुपये एक्स-शोरूम निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेऊया BMW च्या या बाईक्सचे फिचर्स... 

तीन मोड... 

BMW च्या या लेटेस्ट बाईक्समध्ये एक फुल-एलईडी लायटिंग सेटअप, एक यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि एक ब्ल्यूटूथ-इनेबल्ड टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, ABS प्रो व्यतिरिक्त तीन राइड मोडही देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इको, रोड आणि रेन यांचा समावेश आहे. कंपनीने यामध्ये हिल-स्टार्ट कंट्रोलसारखे स्टँडर्ड रायडिंग एड्स फिचर्सही दिले आहेत. 

मिळतील हे खास फिचर्स 

BMW च्या बाईकच्या ऑप्शनल किटमध्ये इलेक्ट्रॉनिक अॅडजस्टेबल सस्पेंशन, ऑटोमेटेड हिल-स्टार्ट कंट्रोल, हीटेड सीट्स, डायनेमिक ब्रेक असिस्टेंट, राईड प्रो मोड्स (डायनॅमिक, डायनॅमिक प्रो, एंडुरो आणि एंडुरो प्रो) आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. स्टँडर्ड R 1250 GS मध्ये अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. तसेच हाय-स्पेक अॅडव्हेंचर्स ट्रिममध्ये ट्यूबलेस-टायर कम्पॅटिबल स्पोक व्हिल्स देण्यात आले आहेत. 

दमदार इंजिन 

BMWच्या R 1250 GS आणि R 1250 GS Adventure मध्ये 1,254 cc, ट्विन-सिलेंडर बॉक्सर इंजिन देण्यात आलं आहे. जे 134 बीएचपीच्या मॅक्सिमम पॉवर आणि 143 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्याचं काम करतो. इंजिनमध्ये बीएमडब्ल्यूची शिफ्ट कम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच हे 6-स्पीड ट्रांसमिशनसह येणार आहे. 

यांच्याशी होणार स्पर्धा 

BMW R 1250 GS ची स्पर्धा भारतात डुकाटी स्ट्रीटफायटर V4 आणि ट्रायम्फ स्पीड ट्रिपल 1200 आरएस यांसारख्या मोटरसायकल्सशी होणार आहे. या बाईक्स आपल्या परफॉर्मंसमुळे रायडर्समध्ये नेहमीच चर्चेत असतात. अशातच, 2021 BMW R 1250 GS रायडर्सच्या पंसतीस उतरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget