एक्स्प्लोर
ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!

मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी 59 टक्के यूझर्स, जे ऑनलाईन डेटिंग अॅप वापरतात, त्यांना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्व्हेमधून ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
विशेषत: फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईनशी संबंधित अॅप, रोमँटिक थीम, लव्ह मीटर टेस्ट, ग्रीटिंग आणि गेम्सचा वापर स्मार्टफोन यूझर्सकडून वाढतो. त्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.
'नॉर्टन'च्या सर्व्हेनुसार, भारतात डेटिंग बेस्ड सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर वेगाने वाढत आहे. अनेकजण काही मर्यादित काळासाठी असे अॅप वापरुन अनइन्स्टॉल करतात. सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेतात आणि यूझर्सचा इंटरेस्ट पाहून ऑफर देतात.
नॉर्टनच्या सर्व्हेनुसार, 64 टक्के महिला आणि 54 टक्के पुरुषांना सायबर सिक्युरिटीशी संबंधित अडचणींना सामोरं जावं लागलं.
सिक्युरिटी फर्मच्या सल्ल्यानुसार, अशा कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका, जी तुमच्या जुन्या काँटॅक्टच्या माध्यमातून आली असेल. कारण सायबर क्रिमिनल्स अशा काँटॅक्टचा गैरवापर करत असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यास पॉर्न वेबसाईट किंवा वेबकॅम साईट उघडतात.
अनेकदा अशाही लिंक ऑनलाईन डेटिंग अॅपवर येतात, ज्यावर क्लिक केल्यास व्हायरसचा धोका निर्माण होतो. बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्सची चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
ज्यावेळी ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरत असाल, त्यावेळी व्हेरिफाईड कंपनीचं अॅप आहे की नाही, हे तपासून पाहिलं पाहिजे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
जळगाव
विश्व
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
