(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto Tips : पावसाळ्यात गाडीची काळजी कशी घ्याल?
पावसाळ्यात गाड्यांची टेललाईट आणि हेडलाईट योग्यप्रकारे काम करत नाहीत. हेडलाईट किंवा टेललाईट खराब असल्याने अपघात होण्याचीही शक्यता असते.
मुंबई : पावसाळा सुरु झाला की गाड्यांची काळजी घेणे गरजेचं बनतं नाहीतर ते पुढे जास्त खर्चिक बनतं. पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी साचते त्यामुळे गाडी चालवणे अवघड बनतं. यासोबतच गाडीचेही बऱ्याचदा नुकसान होते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात गाडीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, तसेच तुमच्या गाडीची कंडिशनसुद्धा चांगली असायला हवी. पावसाल्यात गाड्यांना अनेक प्रॉब्लेम येतात, याबद्दल माहिती असणे गरजेचं आहे.
चेसिसमध्ये पाणी भरतं
पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या चेसिसच्या आत अनेकदा पाणी जाते. ज्यामुळे गाडीचे बरेच नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, चेसिसमध्ये भरलेले पाणी सर्विस सेंटरमध्ये जाऊन काढून टाकले पाहिजे.
हेडलाईट खराब होते
पावसाळ्यात गाड्यांची टेललाईट आणि हेडलाईट योग्यप्रकारे काम करत नाहीत. हेडलाईट किंवा टेललाईट खराब असल्याने अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये रात्री गाडीला हेडलाईट आणि टेललाईट असणे खूप गरजेचं आहे.
कार स्वच्छ करा
जर कार पावसात भिजली असेल तर पाऊस थांबल्यानंतर ती साफ जरुर करा. कारण पावसाच्या पाण्यामुळे गाड्यांच्या बर्याच भागात पाणी शिरते. जर ते काढले नाही तर गाडीच्या बॉडीचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर गाडी गंजण्याचा धोका देखील असतो.
गाडीला ऑईलिंक करताना काळजी घ्या
जर आपण डिझेल आणि बर्न मोबिल ऑईल एकत्र करुन गाडीच्या खालच्या भागावर, इंजिनच्या सभोवती आणि लीफ स्प्रिंगवर लावले तर आपली गाडी गंजण्यापासून वाचेल. मात्र हे मिश्रण डिस्क ब्रेक, कॅलिपर, व्हील ड्रम आणि रबराच्या भागांवर वापरू नका.
गाडी झाकून ठेऊ नका
पावसाळ्यात गाडी कव्हरने झाकून ठेवण्याची अनेकांना सवय असते. मात्र पावसाळ्यात आपली गाडी झाकून ठेवू नका. गाडी झाकून ठेवल्याने गाडीला गंज लागू शकतो. त्यामुळे पाऊस पडत असताना गाडी झाकून ठेऊ नका.
इतर बातम्या
- Cheapest 7 Seater Cars: सर्वात स्वस्त 7 सीटर फॅमिली कार; वाचा किंमत आणि फीचर्स
- Best Mileage Bikes : उत्तम मायलेज आणि खिशालाही परवडणाऱ्या बाईक; पाहा किंमत आणि फीचर्स
- इंधन परवडत नाही; सोप्या टिप्स वापरुन गाडीचं मायलेज वाढवा
- Electric Cars | देशात 'या' इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ, काय आहेत फीचर्स आणि किंमत?