एक्स्प्लोर
आसुसचा झेनफोन 3 लेसर भारतात लाँच, किंमत रु. 18,999

मुंबई: तैवानी कंपनी आसूसनं भारतात आपला नवा डिव्हाइस झेनफोन 3 लेसर लाँच केला आहे. या फोनची किंमत 18,999 रु. आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. हा फोन ई-कॉमर्स स्टोरसोबत ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. 'झेनफोन 3च्या या रेंजसोबत आम्ही भारतातील एक मोठ्या ग्राहक वर्गाला नक्कीच आकर्षित करु' असा विश्वास आसुसचे भारतातील प्रमुख पीटर चांग यांनी व्यक्त केला. झेनफोन 3 लेसर स्मार्टफोनचे खास फीचर्स: * 5.5 इंच 2.5D कर्व्ह्ड स्क्रीन, रेझ्युलेशन 1920x1080 पिक्सल * स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर * 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी * 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
आणखी वाचा























