एक्स्प्लोर
अॅपल आयफोन 8 चा लाँचिंग मुहूर्त ठरला!
आयफोन 8 12 सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठीही उपलब्ध होईल, असा अंदाज लावला जात आहे.

फोटो : Danny Winget/YouTube
मुंबई : अॅपलचा आगामी फोन आयफोन 8 विषयी बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन कधी लाँच होईल, याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मात्र mac4ever या वेबसाईटच्या वृत्तानुसार हा फोन दोन आठवड्यांनी म्हणजे 12 सप्टेंबरला लाँच होणार आहे. 12 सप्टेंबरला हा फोन लाँच झाल्यानंतर 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठीही उपलब्ध होईल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र अॅपलकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 5.8 इंच आकाराची OLED स्क्रीन असेल. तर वायरलेस चार्जिंग फीचर असणारा कंपनीचा हा पहिलाच फोन असेल. अॅपल या फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देणार की नाही, याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. कारण क्वालकॉमच्या या इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरच्या शिपिंगसाठी उशीर होणार आहे. त्यामुळे अॅपल यामध्ये टच आयडी सेन्सर टेक्नीक देणार नाही, असा अंदाज लावला जात आहे.
आणखी वाचा























