एक्स्प्लोर
'अॅप'डेट : स्मार्ट वाचकांसाठी खास पाच अॅप्स
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. त्या स्मार्टफोनमध्ये आपापल्या आवडीनुसार, गरजेनुसार किमान 40-50 अॅप असतात. एकंदरीत अॅपचा वापर प्रचंड वाढला आहे. आम्हीही तुम्हाला 'अॅपडेट'च्या माध्यमातून आपल्या रोजच्या आयुष्यात उपयुक्त अॅपची ओळख करुन देणार आहोत.
मुंबई : प्रिंटेड पुस्तके वाचण्याची मजाच और असते. मात्र आताचा काळ इतका धावपळीचा आहे की एका ठिकाणी निवांत बसून पुस्तक वाचणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोनवर पुस्तक वाचण्यासाठी मार्ग शोधत असतात. अशा 'स्मार्ट' वाचकांसाठी आम्ही खास पाच अॅप्स सजेस्ट करणार आहोत.
1. लित्झी (Litsy) : वाचकांचा सोशल मीडिया म्हणजे लित्झी अॅप आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील वाचकांना जोडून घेण्याचा प्रयत्न या अॅपच्या माध्यमातून होऊ शकतो. शिवाय इतर वाचकांसोबत पुस्तकांसंबंधी चॅटिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. इन्स्टाग्राम टाईप असलेल्या या अॅपमध्ये पुस्तकांचे फोटो, कोट्स, रिव्ह्यू असे सगळे एका ठिकाणी मिळतात.
गुगल प्ले स्टोअरवर या अॅपची साईज 49 टक्के एवढी असून, अँड्रॉईड 4.1 आणि त्याहून अपडेटेड सिस्टिममध्ये हे अॅप इन्स्टॉल करणे शक्य आहे. कॅच-84 या संस्थेने तयार केलेल्या या अॅपला गुगल स्टोअरवरही चांगल्या प्रतिक्रिाय वाचायला मिळतात.
2. गुगल प्ले बुक्स (Google Play Books) : ई-रिडर अॅपमधील वन ऑफ द पॉप्युलर अॅप म्हणून गुगल प्ले बुक्सकडे पाहिले जाते. हाताळण्यास सहज आणि सोपे असलेल्या या अॅपमध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत. पुस्तक वाचताना बुकमार्कची सोय, कमेंट अॅड करणे, नाईट लाईट, फॉन्ट कमी-जास्त करणे, गुगल ट्रान्सलेट इत्यादी फीचर्स यात देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, मोफत पुस्तके तर आहेतच, सोबत जी पुस्तके पैसे देऊन खरेदी करायची आहेत, त्यांचे प्रिव्ह्यू उपलब्ध असतात. त्यामुळे पुस्तकातील प्रस्तावनेसह काही पाने वाचता येतात. अर्थात त्यामुळे पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते.
गुगल कंपनीचं हे अॅप अनेक स्मार्टफोनमध्ये बाय-डिफॉल्ट असतो. मुळात गुगलची खासियतच अशी की, त्यांच्या सर्व सुविधा (जीमेल, ब्लॉग इ.) एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन दिल्या जातात. गुगल प्ले बुक्ससाठीही तीच प्रक्रिया आहे. त्यामुळे हे अॅप वापरण्यासाठी वेगळ्या लॉग इनची गरज भासत नाही. जीमेल वापरत असाल, तर त्याच युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने तुम्ही हे अॅप वापरु शकता.
3. गुडरिड्स (Goodreads) : स्वत:च्या आवडीची पुस्तके वाचण्यासोबतच, मित्रांनी सूचवलेली पुस्तकेही वाचू शकता. त्यासाठी रिकमन्डेशन्स नावाचा पर्याय देण्यात आला आहे. आपण किती पुस्तके वाचली, मित्रांनी किती वाचली, अशा स्पर्धा टाईप चॅलेन्जेससाठी रिडिंग चॅलेन्ज नावाचा पर्याय सुद्धा यात आहेत. अर्थात, ही सारी वाचन वाढवण्यासाठीची धडपड आहे. ग्रुप, मायबुक्स, फ्रेण्ड्स असे फीचर्सही यात आहेत. सॅम्पल बुकही देण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या साईजमध्ये हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, कोट्यवधी स्मार्टफोन युजर्सनी हे अॅप आतापर्यंत इन्स्टॉल केले आहे. ऑनलाईन पुस्तक वाचण्याचा एक उत्तम अनुभव घेण्यासाठी हे अॅप ट्राय करायला काहीच हरकत नाही.
4. स्क्रिब्ड (Scribd - Reading Subscription) : सबस्क्रीप्शनच्या माध्यमातून वाचनासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणजे स्क्रिब्ड अॅप. पुस्तके, ऑडिओबुक्स, मॅगझिन, डॉक्युमेंट्स, शीट, म्युझिक आणि बरेच काही यात आहे. तुम्ही जसे सबस्क्रिप्शन देऊन डाऊनलोड करु शकता, तसेच अपलोड करण्याचीही सुविधा आहे.
सुरुवातील 30 दिवसांचा ट्रायल दिली जाते, त्यानंतर सबस्क्रिप्शनचा पर्याय तुमच्यासमोर उभा राहतो. अर्थात, सबस्क्रिप्शन करायचे की नाही, हे तुमच्यावर अवलंबून असते. जगभरातील विविध वृत्तपत्रेही इथे लिस्ट करण्यात आली आहेत.
रिकमेन्डेशन, शेअर, स्टोअर ऑफलाईन असे अनेक फीचर्स स्क्रिब्डमध्ये आहेत. पुस्तक वाचत असताना फॉन्टची साईज कमी जास्त करणे, संपूर्ण पानाचा रंग आपल्या डोळ्यांना अनुकूल करणे इत्यादी गोष्टीही या अॅपमध्ये आहेत.
5. वॅटपॅड (Wattpad) : वॅटपॅड अॅप तरुण वाचकांमध्ये अधिल लोकप्रिय आहे. कारण अॅक्शन, रोमान्स, फॅन्टसी अशा विभागातील पुस्तकांचा फराळ इथे पुरेपूर आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी स्वतंत्र सेक्शन्स आहेत. सोशल मीडिया टाईप वाचकांची कम्युनिटी तयार करता येऊ शकते. फॉलो-अनफॉलोचे फीचर्स आहे.
पुस्तक वाचत असताना एखादं वाक्य सिलेक्ट करुन त्यावर आपापली इनलाईन कमेंट लिहिणे किंवा ते वाक्य शेअर करणे अशा गोष्टीही यात आहेत. या अॅपचं विशेष आकर्षण म्हणजे इथे युजर्स आपली स्वत:ची कथाही लिहू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
बीड
राजकारण
Advertisement