एक्स्प्लोर
Advertisement
आता तुमचं ट्विटर हँडलही होईल व्हेरिफाईड
नवी दिल्लीः सामान्य युझर्सला आणि खाजगी संस्थांना ट्विटरवर सेलेब्रिटी दर्जा मिळणार आहे. सर्वांना आपलं ट्विटर अकाऊंट आता व्हेरिफाईड करता येणार आहे. यापुढे तुमच्या नावाच्या पुढेही निळा मार्क दिसणार आहे.
व्हेरिफाईड अकाऊंट करण्यासाठी तुम्हाला ट्विटरच्या सपोर्ट पेजवर जाऊन एक फॉर्म भरायचा आहे. सामान्य युझर्स, कंपनी, माध्यमसंस्था, उद्योगपती, सरकारी संस्था, राजकीय व्यक्ती अशा महत्वाच्या अकाऊंट समोर यापुढे निळा मार्क लावता येणार आहे.
असं करा व्हेरिफाईड अकाऊंट
ट्विटरच्या सपोर्ट पेजवर यासाठी फॉर्म उपलब्ध आहे. व्हेरिफाईड अकाऊंटसाठी ट्विटरने काही अटी ठेवल्या आहेत, त्या या पेजवर दिसतील. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल व्हेरिफाय करावा लागेल. पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा. सोबतच अधिकृत ओळखपत्राची स्कॅन कॉपी देखील आवश्यक आहे.
सर्व कागदपत्र आणि अटींची पूर्तता झाल्यानंतर ट्विटरकडून युझर्सला ई-मेलद्वारे रिप्लाय दिला जातो. रिप्लाय न आल्यास 30 दिवसांनंतर पुन्हा अर्ज करता येऊ शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement