एक्स्प्लोर
अभिनेते अनुपम खेर यांच्यासह दिग्गज नेत्यांचंही ट्विटर हँडल हॅक
तुर्कीश आर्मी ग्रुपने आपलं ट्विटर हँडल हॅक केल्याची महिती अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतःच दिली आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, भाजपचे सरचिटणिस राम माधव आणि राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं. तुर्कीश आर्मी ग्रुपने आपलं ट्विटर हँडल हॅक केल्याची महिती अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतःच दिली. अनुपम खेर यांच्या ट्विटर अकाऊंटवर चक्क ‘आय लव्ह पाक’ असं लिहिलेले मेसेज काल ट्वीट होऊ लागले. अनुपम खेर यांचं ट्विटर अकाउंट हॅक करत हॅकर्सनी स्वत:ची ओळखही सांगितली. 'तुमचं अकाउंट 'अय्यीलदिज तिम' या तुर्कीमधील सायबर आर्मीद्वारे हॅक करण्यात आलंय. तुमचा महत्त्वाचा डेटादेखील आम्ही कॅप्चर केलाय, असं 'अय्यीलदिज तिम'हॅकर्सनी सांगितलं. दरम्यान, या घटनेबद्दल माहिती मिळताच ट्विटरशी संपर्क साधून अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं, अशी माहितीही अनुपम खेर यांनी दिली. सुरक्षित इंटरनेट दिनालाच हे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले. हा दिवस जगभरात साजरा केला जातो, जेणेकरुन टेक्नोलॉजी आणि मोबाईलचा सुरक्षित वापर करण्याबाबत जनजागृती व्हावी.
आणखी वाचा























