एक्स्प्लोर
अॅमेझॉनचे 10,000 नवे स्टोअर्स सुरु
नवी दिल्ली: ई-कॉमर्स क्षेत्रातली नामांकित कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपला विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टनुसार अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच कंपनीने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून 10,000 नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.
रिपोर्टमधील माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अॅमेझॉन इंडियाची फ्लिपकार्ट ( त्याची सहय्योदी कंपनी मित्राला सोडून)च्या तुलनेत जास्त विक्री झाली आहे. त्यामुळे 2019पर्यंत अॅमेझॉन इंडियाचा विस्तार 37%नी वाढ होण्याची शक्यता रिपोर्टमधून व्यक्त केली जात आहे.
या रिपोर्टनुसार, अॅमेझॉनला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे त्याचा सर्वाधिक फटका स्नॅपडील आणि इतर छोट्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीना होणार आहे. या रिपोर्टमध्ये फ्लिपकार्ट आपले अव्वल स्थान कायम राखेल असेही म्हटले आहे.
याशिवाय आगामी सणासुदीच्या काळानिमित्त आपली धोरणे निश्चित केली असून amazon.com ने आपल्या 'आय हॅव स्पेस' कार्यक्रमासाठी 10,000 नवे स्टोअरस सुरु केले आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून कंपनी आपली वितरण व्यवस्था अधिकच मजबूत करत आहे. या संख्येमुळे अॅमेझॉनच्या भारतातील एकूण स्टोअर्सची संख्या 12,500पर्यंत पोहचली आहे.
अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अखिल स्कसेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेली वस्तू लवकरात लवकर हवी असते. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळासाठी आम्ही आमचा विस्तार पाचपटीने वाढवत आहोत. त्यामुळे आमच्या स्टोअर्सची संख्या आता 12,500पर्यंत पोहचली आहे. कंपनीच्या 'आय हॅव स्पेस' योजनेसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील 50 हुन अधिक शहरांमध्ये स्टोअर्स सुरु करण्यात आले आहेत.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement