एक्स्प्लोर
अमेझॉनची ड्रोन डिलीव्हरी सुरु, केवळ 13 मिनिटात ऑर्डर पोहचवली
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये अमेझॉनने ड्रोन डिलीव्हरीची सेवा सुरु केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे ही ऑर्डर ग्राहकाला केवळ 13 मिनिटांमध्ये मिळाली. अमेझॉनचा ड्रोन डिलीव्हरीचा पहिला प्रयोग इंग्लंडमध्ये यशस्वी झाला आहे.
लंडन येथील कँब्रिजमध्ये राहणारे रिचर्ड बी यांनी अमेझॉनवर एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पॉपकॉर्न पॉकेटची खरेदी केली. बूकिंगनंतर ऑर्डरचा मेसेज अमेझॉनच्या कार्यालयातून थेट वेअरहाऊसमध्ये पाठवण्यात आला. वेअरहाऊसमधू वस्तू पॅक करुन एस्केलेटरवर ठेवण्यात आली.
वेअरहाऊसच्या बाहेर तयार असलेल्या ड्रोनमध्ये एस्केलेटरद्वारे ही वस्तू पोहचवण्यात आली. बूक केल्यानंतर वस्तू ड्रोनपर्यंत पोहचण्यासाठी केवळ 6 मिनिटांचा कालावधी लागला. ड्रोनने तातडीने बूक करण्यात आलेल्या ठिकाणाच्या दिशेने झेप घेतली. केवळ 7 मिनिटांमध्ये रिचर्ड यांच्या घराबाहेरच्या कंपाऊंडमध्ये त्यांना बूक केलेली वस्तू मिळाली.
या डिलीव्हरीची विशेषता म्हणजे ड्रोनला ग्राहकाचा पत्ता देखील कंम्प्युटरद्वारे मिळतो. तर डिलीव्हरी बूक केल्यानतंर अमेझॉनच्या ऑफिसमध्ये मेसेजही ड्रोन सिस्टीमद्वारेच जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement