एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट: बिझनेसची ट्रिक सांगून बलाढ्य 'अलिबाबा' निवृत्त!
चीनमधल्या सर्वात मोठ्या अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीचा सहसंस्थापक हा जॅक मा आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये चर्चेत आहे.
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चीन आणि परिणामी आशियाच्या उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. चीनची बडी कंपनी ‘अलिबाबा’चा कार्यकारी अध्यक्ष आणि सहसंस्थापक जॅक मा ने यशाच्या शिखरावर असताना व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे.
“20 ते 30 वर्षांच्या कालावधीत तुम्ही योग्य बॉसला फॉलो केलं पाहिजे. एका प्रतिष्ठीत कंपनीत योग्यरितीनं काम कसं केलं पाहिजे, हे शिकावं. जेव्हा तुम्ही तिशी-चाळीशीत असाल तेव्हा तुम्हाला काही स्वत:चं असं करायचं असेल तर ते करावं. या काळात तुम्ही नापास होणं किंवा अपयशी होणं स्वीकारु शकता.त्यानंतर पन्नाशीपर्यंत तुम्ही ज्या कामात सर्वोत्तम आहात ते काम केलं पाहिजे. खूप मनोरंजक दिसणाऱ्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे, कारण त्या वयात ते तुमच्यासाठी थोडं धोकादायक असू शकतं. 50 ते 60 वर्ष वय असेल तेव्हा तुम्ही पुढच्या पीढीला प्रशिक्षण देण्यात, त्यांना घडवण्यात वेळ घालवला पाहिजे, आणि वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्ही तुमच्या नातवांसोबत वेळ घालवला पाहिजे”,
वयोमानाच्या टप्प्यानुसार सल्ला देणारा हा कुणी साधासुधा व्यक्ती नाही, तर, हा आहे चीनमधल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक जॅक मा.
चीनमधल्या सर्वात मोठ्या अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीचा सहसंस्थापक हा जॅक मा आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये चर्चेत आहे.
येत्या सोमवारी म्हणजेच 10 सप्टेंबरला जॅकमाचा 54 वा वाढदिवस आहे. याच दिवशी त्यानं व्यावसायिक आयुष्यातून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपला पूर्ण वेळ आणि पैसा शिक्षण क्षेत्रासाठी देणार असल्याचंही जाहीर केलं
जॅक मा म्हणतो, “शिक्षण हे आजच्या काळासमोरचं मोठं आव्हान आहे. आपण आज जर शिकवण्यात बदल केला नाही, तर येत्या 30 वर्षात खूप भयानक स्थिती असेल. आपण ज्या पद्धतीनं आपल्या मुलांना शिकवतोय, तो मागील 200 वर्षांपासून आलेल्या माहितीपर आधारित अभ्यासक्रम आहे. आपण मुलांना तंत्रासोबत स्पर्धा करण्याचं शिक्षण देत नाही. ते अत्यंत हुशार आहेत. पण आपल्याला त्यांना असामान्यरित्या घडवावं लागेल, जेणेकरुन भविष्यात तंत्रालाही ते मागे सारतील.
जॅक माचं खरं नाव- मा यून
जन्म- 10 सप्टेंबर, 1964 मध्ये हांगझाऊ प्रांतात झालाय.
शिक्षण- हांगझाऊ विद्यापीठातून बी ए इन इंग्लिशची पदवी घेतली
च्युंग काँग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिजनेसमधून पदवी
संपत्ती- तब्बल 38.6 बिलीयन अमेरिकन डॉलर्स, भारतीय चलनानुसार सुमारे 3 हजार अब्ज रुपये
जॅक मा आज चीनमधील प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक आहेत. पण तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही की, जॅक मांना बीए इन इंग्लिशची पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी चार वर्षे चार वेळा परीक्षा द्यावी लागली. बरं, एवढंच नाही तर त्यांच्या हांगझाऊ शहरात केएफसीसारखा ब्रँड आल्यावर तिथं नोकरीसाठी आलेल्या 24 पैकी 23 जणांना निवडलं गेले, पण एकट्या जॅक मांना रिजेक्ट करण्यात आल्याचीही नोंद आहे. तरी, जॅक मा खचले नाहीत.
1999 साली जॅक मा यांनी अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली
या कंपनीची आर्थिक उलाढाल म्हटली तर, जिथं केएफसीनं त्यांना नोकरी नाकारली होती, तिथं आज जॅक मांच्या नेतृत्वात शेकडो माणसं कामं करायला लागली. चीनमधल्या शिक्षीत, कष्टकरी अशा तरुणवर्गाला त्यांनी रोजगार दिला. त्यामुळे तिथल्या अनेक घरांमध्ये जॅक मांची पूजा केली जात असल्याच्या चर्चा आहे. चीनच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातही जॅक मांचा मोठा हात आहे. त्यांची सोशल मीडियावरील प्रेरणादायी भाषणं जगभरातील तरुणाईनं नेहमीच उचलून धरली
जॅक मा म्हणतात, “सर्वात आधी तर मला तंत्रज्ञानाविषयी काही माहिती नव्हती, मॅनेजमेंटची काहीच जाण नव्हती. मला वाटतं, तुम्हाला सर्व गोष्टी माहित असण्याची गरज नाही. तुम्ही नेहमी तुमच्यापेक्षा स्मार्ट, हुशार माणसं शोधली पाहिजेत. अनेक वर्षे तर मी माझ्यापेक्षा स्मार्ट माणसांच्या शोधात होतो. एकदा तुम्ही अनेक स्मार्ट माणसं शोधली की, त्यानंतर त्यांच्याकडून एकत्र काम करवून घेणं हेच आपलं काम राहतं. जर ती स्मार्ट माणसं एकत्र काम करु शकत असतील, तर तुम्हांला तुमचं ध्येय गाठणं अधिक सहज आहे. मूर्ख माणसं सहजरित्या एकत्र काम करु शकतात, पण स्मार्ट माणसं कधीच शक्य नाही”
जगातल्या फोर्ब्स, टाईम्स यासारख्या बड्या मासिकांच्या यादीत जॅक मा यांचं नाव झळकलं. आशिया खंडातले सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी जॅक मांची काही दिवसांपूर्वीपर्यंतची ओळख होती. पण नुकतंच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानींनी त्यांना मागे टाकलं.
कधीकाळी शिक्षणासाठी, नोकरीसाठी झटलेला जॅक मा पुढे अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चीनचं प्रतिनिधीत्व करु लागला. आणि आज यशाच्या शिखरावर असताना त्यानं निवृत्ती घेतल्यानं सध्या चीन उद्योग जगतात खळबळ माजली आहे. पण निवृत्तीवेळीही जॅक मांचं म्हणणं आहे, निवृत्त होतोय, म्हणजे एका युगाचा अंत झालेला नाही, तर ही एका नव्या युगाची सुरुवात आहे.
संबंधित बातम्या
'चाळीस चोरां'च्या कथेतील 'अलीबाबा'चं नावं चीनमधील बलाढ्या कंपनीने का ठेवलं?
मुकेश अंबानींनी 'अलिबाबां'ना मागे टाकलं, आशियातील सर्वात श्रीमंत!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement