एक्स्प्लोर
एअरटेल पेमेंट बँकेत बचत खात्यावर 7.25 टक्के व्याज
नवी दिल्ली : एअरटेल पेमेंट बँकेत बचत खात्यावर 7.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारती एअरटेलच्या पेमेंट बँकेचं उद्घाटन केलं. ही देशातील पहिली बँक पेमेंट बँक आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्रात पेमेंट बँकेच्या रुपाने नवा प्रयोग केला जातो आहे. या पेमेटं बँकेत एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा केले जाऊ शकत नाहीत. शिवाय, पेमेंट बँकेकडून कर्जही दिले जाणार नाही.
भारती एअरटेलच्या माहितीनुसार, पेमेटं बँकेत अवघ्या तीन मिनिटात खाते उघडता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कागदपत्रांशिवाय खाते उघडता येणार आहे. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड नंबर असायला हवा. कारण आधारकार्डाच्या माध्यमातून तुमची सर्व माहिती बँकेत गोळा केली जाईल.
खातेदारांचा मोबाईल नंबरच बँक खात्याचाही अकाऊंट नंबर असेल. त्यामुळे वेगळा अकाऊंट नंबर लक्षात ठेवण्याचीही गरज भासणार नाही.
भारती इंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्या माहितीनुसार, बचत खात्यावर 7.25 टक्के दराने व्याज देणं, ही पेमेंट बँकेची सुरुवातीची ऑफर आहे. बँकिंग क्षेत्रातील चढ-उतारानुसार यात पुढे बदल होत जातील. सुरुवातीच्या व्याज दरातील काही भाग बँक सबसिडीच्या रुपाने देईल.
देशातील 27 कोटी मोबाईल ग्राहकांपैकी किमान 10 कोटी ग्राहक पेमेंट बँकेचे ग्राहक बनतील, असा विश्वासही सुनील मित्तल यांना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement