हायब्रिड वर्क मॉडेलमध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 'या' पाच गोष्टी सहाय्यकारी ठरु शकतात, जाणून घ्या
वेगवेगळ्या वातावरणात काम करताना उत्पादन आणि गुणवत्ता याचे संतुलन ठेवणे ही एक मोठे आव्हान आहे.
सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून पुन्हा जीवन पूर्वपदावर येत आहे. अनेक कर्मचारी कार्यालयात पुन्हा रूजू धाले आहेत. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी अनेक कंपन्यांनी हायब्रीड वर्क मॉडेलचा वापर करण्यात आहे. या वर्क मॉडेलमध्ये लोकेशन फ्लेक्सिबल, हायब्रिड कार्य मॉडेल तसेच उत्पादन वाढण्यास मदत होते. दरम्यान घरातून दोन वर्षे काम केल्यानंतर पुन्हा कार्यलयात येऊन काम करणे थोडे अवघड जाणार आहे. याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम ते हायब्रिड मॉडेलचा वापर केला पाहिजे. खालील पाच टिप्स तुमचे जीवन सुखर बनवण्यास मदत करेल
योग्य टूल आणि अॅप्सचा वापर करा
हायब्रीड कार्यप्रणालीमध्ये उत्पागन वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजी सर्वात महत्त्वपूर्ण भूमीका बजावणार आहे. हायब्रिड कार्यप्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे गेले तर कर्मचाऱ्यांना कोणत्याही वातावरणात काम उत्तमरीत्या करता येणार आहे. हे करण्यासाठी क्लाउट स्टोरेजचा वापर केला पाहिजे त्यामुळे टीमला कोणत्याही फाईल सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलचा वापर करून ऑपरेशनल मोबाईल ऑफिस, डिव्हाईसमध्ये वर्क अॅप्स सिन्क करण्यास मदत होणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने डाटा आणि वेळ दोन्हीची बचत होणार आहे. तसेच दोन वर्षानंतर कामावर पुन्हा रुजू होणाऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार आहे.
वर्क सेटअप
सर्वोत्कृष्ट कार्यप्रणाली जी आहे ज्यामध्ये चांगले उत्पादन मिळण्यासाठी योग्य टूल्स आणि इक्विप्मेंट्सचा वापर करत चांगले डिझाईन तयार केले जाते. तसेच फंक्शनल की बोर्ड आणि माऊस, एक लॅपटॉप, एक खुर्ची आणि इतर गरजेच्या गोष्टी आवश्यक आहे. तसेच एक ब्रॉडबँड आणि चांगल्या नेटवर्क कनेक्शनची देखील गरज आहे. वेगवान इंटरनेटची देखील आवश्यकता आहे. उदा. एअरटेल एक्सट्रीम फायबर 1 जीबीपीएस इतका वेग देतो. ज्यामुळे तुम्ही घरी आणि ऑफिसमध्ये देखील इंटरनेटचा वापर करू शकता. फक्त एवढचं नाही तर इतर अनेक फायदे देखील आहे. जर तुमच्या इंटरनेटमध्ये काही अडथळे येणार असेल तर एअरटेल ग्राहकांना प्लान्ड आउटेज, अपग्रेड किंवा अडथळा येणार असेल तर पूर्वकल्पना देते. जे यूजर्सची चिंता दूर करते. जर कोणाला घरी काम करताना अडचणी येत असेल तर त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या शिवाय यूजर्स घरातून कनेक्टिव्हिटी समस्या दूर करण्यास मदत होईल. ही सुविधा यूजर्ससाठी सोपी आहे.
कामासाठी निश्चित जागा
ऑफिस आणि घर अशी दुहेरी तारेवरची कसरत केल्यानंतर मन अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम आपल्या कामावर देखील होते. आपल्या कामावर परिणाम न होता काम करण्यासाठी घराप्रमाणे ऑफिसमध्ये देखील एका समान सेट अपची आवश्यकता आहे. त्यासाठी एक आरामदायक जागा असणे गरजेचे आहे. ऑफिसप्रमाणे घरी एक सेट बनवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या कामावर परिणाम होणार नाही. घरी वर्क टेबल आणि खुर्चीसह अन्य महत्त्वाच्या गोष्टी ठेवणे गरजेचे आहे.
वेळेचे महत्त्व
रोज काम सुरू करण्याची एक निश्चित वेळ ठरवावी. रोज ठरलेल्या वेळेत काम सुरू करावे. उदा. वर्क फ्रॉम होम करताना ईमेल आणि ऑफिसचे मेसेज वाचण्याची निश्चित अशी वेळ नव्हती. मात्र ऑफिसमध्ये काम करताना काम बंद करण्याची वेळ ठरलेली असते. एका विशिष्ठ वेळी काम बंद करणे गरजेचे आहे.
फ्लेक्सेबिटीचा वापर करावा
फ्लेक्सेबिलीटी ही हायब्रीड वर्कस्पेस मॉडेलमध्ये मदत करते. पारंपारिक कामच्या विरुद्ध ही कार्यप्रणाली आहे. हायब्रीड प्रणाली वेगवेगळ्या मॉडेलला जोडण्याचे काम करते. उत्पादन वाढवण्यास मदत करते. हायब्रिड प्रोडक्टिव्हिटी शिखरावर पोहचण्यासाठी ऑफिस आणि WFH मॉडेलचा पर्याय खुला ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोना महामारी अगोदर जे नियम होते, त्यामध्ये सवलत देणे गरजेचे आहे. कोरोनानंतर हायब्रीड वर्किंग अधिक व्यापक होत जाणार आहे. त्यामुळे बदलत्या वेळेनुसार आपण देखील यासाठी तयार राहणे आवश्यक आहे.