पाकिस्तानी चहावाल्यानंतर, नेपाळची भाजीवाली चर्चेत

मुंबई: इंटरनेट जगतात जगाच्या कानाकोपऱ्यात काय-काय घडतं ते सहज नेटीझन्सपर्यंत पोहोचतं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील निळ्या डोळ्यांचा चहावाला जगभरात चर्चेत होता. त्यानंतर आता नेपाळची भाजीवाली सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
नेपाळची भाजीवाली मुलगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
तीचे दोन फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ही भाजीवाली पाठीवर भाजीची टोपली घेतलेली दिसत आहे. सौंदर्य आणि निरागस चेहरा यामुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

पाकिस्तानी चहावाला अर्शद खानला मॉडेलिंगची ऑफर मिळाली. चहावाला मॉडेल बनला. त्यामुळे चहावाल्या अर्शदप्रमाणे इंटरनेटवर लाईक्स मिळवणाऱ्या या नेपाळच्या भाजीवालीचंही नशीब चमकणार का, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.























