एक्स्प्लोर
Advertisement
वायरल चेक : अमेझॉनवर 199 ला DSLR, 11 रुपयांना अॅपलवॉच?
'दिवाळीनंतर अॅमझॉनचा आणखी एक बंपर सेल, ऑनलाईन खरेदीवर 99 टक्क्यांची सूट, महागड्या वस्तू अगदी क्षुल्लक दरात' अशा ऑफरचा मेसेज सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे.
पुणे : ऑनलाईन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. ऑनलाईन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत असतात. 'अमेझॉन' या ई कॉमर्स वेबसाईटच्या ऑफर्सचा मेसेज सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मात्र कंपनीचं 'दिवाळं' काढू शकणाऱ्या या 'दिवाळी सेल'च्या मेसेजमध्ये कितपत तथ्य आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
'दिवाळीनंतर अॅमझॉनचा आणखी एक बंपर सेल, ऑनलाईन खरेदीवर 99 टक्क्यांची सूट, महागड्या वस्तू अगदी क्षुल्लक दरात' अशा ऑफरचा मेसेज सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉन वेगवेगळ्या ऑफर जाहीर करुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. मात्र यावेळी वायरल झालेला मेसेज अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणारा आहे.
या मेसेजमध्ये, अमेझॉनने ग्राहकांना भन्नाट ऑफर दिल्याचा उल्लेख आहे. कॅनॉन कंपनीचा डीएसएलआर कॅमेरा फक्त 199 रुपये तर व्हिवो कंपनीचा वी 11 मोबाईल अवघ्या 1 हजार 799 रुपयात मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. अॅपल कंपनीची महागडी स्मार्टवॉच फक्त 11 रुपयात मिळणार असंही सांगितलं जात आहे.
या मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करताच ओपन झालेल्या वेबसाईटवर वस्तू खरेदीसाठी एक फॉर्म समोर येतो. पण इतक्या क्षुल्लक दरात इतक्या महागड्या वस्तू कशा काय मिळतात, ही शंका साहजिकच उपस्थित झाल्याने 'एबीपी माझा'ने सायबर एक्स्पर्टशी बातचीत केली.
संबंधित वेबसाईट खोटी असून लिंकवर क्लिक केल्यास तुमची माहिती चोरीला जाण्याची शक्यताही सायबर तज्ज्ञ अतुल कहातेंनी व्यक्त केली. अशा खोट्या वेबसाईटची निर्मिती करणं ही जास्त कठीण काम नाही. अगदी स्वस्तात अशा वेबसाईट तयार होऊ शकतात. त्यामुळे 'एबीपी माझा'च्या वायरल चेकमध्ये हा फॉरवर्ड मेसेज धादांत खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यापुढे कोणत्याही फॉरवर्ड मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्याआधी थोडं जपून. अन्यथा स्वस्तात वस्तू खरेदी करण्याचा नाद तुम्हाला महागात पडू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement