एक्स्प्लोर

Aadhaar Card : आधार बायोमेट्रीक डेटा सहजपणे 'असे' लॉक-अनलॉक करा, जेणेकरून कोणीही गैरवापर करणार नाही

Aadhaar Card : जर तुम्ही आधार बायोमेट्रीक डेटा लॉक करणार असाल, तर तसे करण्यापूर्वी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी जनरेट करणे आवश्यक आहे.

Aadhaar Card : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhar Card) अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या काळात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. ही सामान्य माणसाची ओळख आहे. याद्वारे व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती बाहेर येऊ शकते. तसेच तो एक अतिशय महत्वाचा पुरावा आहे. कारण तो चुकीच्या हातात लागला तर त्याचा चुकीचा वापरही होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे आधार कार्ड कुठेतरी हरवले आहे. आणि ते चुकीच्या हातात मिळण्याची शक्यता आहे, तर तुम्ही ते लॉक करू शकता. प्रत्येक ग्राहकाला UIDAI कडून हे करण्याची सुविधा दिली जाते. जर तुम्ही आधार कार्ड लॉक करणार असाल तर तसे करण्यापूर्वी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी जनरेट करणे आवश्यक आहे. कारण आधार कार्ड लॉक झाल्यानंतर केवायसीशी संबंधित कामासाठी तुम्हाला व्हर्च्युअल आधार क्रमांक आवश्यक असेल. तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे लॉक-अनलॉक करू शकता ते जाणून घ्या.

आधार कार्ड कसे लॉक करावे?

1. यासाठी, प्रथम तुम्हाला UIDAI च्या www.uidai.gov.in अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, येथे जा आणि लॉग इन करा.
2. यानंतर तुम्हाला 'Aadhaar Services' चा पर्याय दिसेल, त्यावर जा आणि 'Aadhaar Services' मधील Lock/Unlock Biometrics पर्याय निवडा.
3. आता येथे तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी टाकावा लागेल.
4. आता कॅप्चा कोडसह send otp वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल.
5. हा ओटीपी एंटर केल्यावर, बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याचा पर्याय असेल. तुम्ही लॉकवर क्लिक करताच तुमचा BIOMETRIC डेटा लॉक होईल.

आधार कार्ड कसे अनलॉक करावे
तुम्ही आधार कार्ड लॉक केलेल्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही त्याच पद्धतीने ते अनलॉक देखील करू शकता. 

आधार कार्डमध्ये महत्त्वाचे वैयक्तिक तपशील

आधार कार्ड ही भारतातील सामान्य माणसाची ओळख आहे. आधार कार्ड हे ओळखपत्र आहे, इतकंच नाही. आधार कार्डच्या माध्यमातून लोक मोबाईल क्रमांकापासून वाहनापर्यंत खरेदी करतात. याशिवाय भारत सरकारच्या सर्व सुविधाही या कार्डद्वारे घेता येतात. आता नागरिकाला कोणत्याही बँकेत खाते उघडायचे असेल, किंवा कुठेतरी प्रवेश घ्यायचा असेल किंवा इतर कोणतेही काम करायचे असेल, या आणि अशा इतर कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये प्रत्येक व्यक्तीचे महत्त्वाचे वैयक्तिक तपशील असतात ज्यात बोटांचे ठसे, बुबुळ आणि चेहर्यावरील प्रतिमा यासारख्या लोकांचे बायोमेट्रिक्स समाविष्ट असतात. या डेटाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी अनेक प्रकरणे दररोज समोर येत असतात ज्यात लोकांच्या आधार कार्डचा गैरवापर होतो. अशा परिस्थितीत, आधार कार्डधारकाला कार्डमधील माहिती सुरक्षित कशी ठेवायची हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. 

UIDAI ची सुविधा

UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतातील सर्व नागरिकांना आधार कार्ड जारी करते. UIDAI नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याची परवानगी देते. एकदा तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केल्यानंतर, कार्डची तुमची सर्व वैयक्तिक माहिती लॉक होईल, त्यानंतर कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. मात्र, या काळात तुम्ही तुमचे आधार कार्ड स्वतः वापरू शकणार नाही.अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केल्यास, वापराच्या वेळी तुम्हाला ते अनलॉक करावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget