अंतराळातील अनेक रहस्य उलगडणार,भारतात जगातील पहिल्या लिक्विड मिरर टेलिस्कोपचे सेटअप
Liquid-Mirror Telescope: भारताने बेल्जियम, पोलंड, कॅनडासह आठ देशांच्या मदतीने जगातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप तयार केला आहे.
![अंतराळातील अनेक रहस्य उलगडणार,भारतात जगातील पहिल्या लिक्विड मिरर टेलिस्कोपचे सेटअप A Unique Liquid-Mirror Telescope sees first light in the Indian Himalayas अंतराळातील अनेक रहस्य उलगडणार,भारतात जगातील पहिल्या लिक्विड मिरर टेलिस्कोपचे सेटअप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/5422e298024aa163a5a899af22838ca3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारताने जगातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप (Liquid-Mirror Telescope) बसवला आहे. उत्तराखंडमधील नैनिताल या ठिकाणच्या देवस्थळ ऑब्जर्व्हेटरीमध्ये एका पर्वतावर हा टेलिस्कोप सेटअप केला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश असून भारताने बेल्जिअम आणि कॅनडाच्या खगोलशास्त्रज्ञांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. या टेलिस्कोपच्या माध्यमातून अंतराळातील सुपरनोव्हा, गुरुत्वीय लेन्स आणि आणि अॅस्टरॉईड यासंबंधीची अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या इंडियन लिक्विड मिरर टेलिस्कोपच्या वतीने अंतराळातील अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
काय आहे लिक्विड मिरर टेलिस्कोप?
लिक्विड मिरर टेलिस्कोप ही एक पातळ फिल्मपासून बनलेल्या 4 मीटर व्यासाची रोटेटिंग मिरर आहे. या माध्यमातून प्रकाश किरणांचे एकत्रिकरण करुन त्यावर फोकस केला जातो. या लिक्विड मिरर टेलिस्कोपला समुद्रसपाटीपासून 2450 मीटर उंचीवर बसवण्यात आलं आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच टेलिस्कोप आहे.
Unique Liquid-Mirror Telescope- built by astronomers from India, Belgium and Canada- sees first light in the Indian Himalayas.
— Science, Technology and Innovation in India (@PrinSciAdvOff) June 3, 2022
ILMT employs a 4-meter-diameter rotating mirror made up of a thin film of liquid mercury to collect & focus light.https://t.co/1kkDWIdqyC pic.twitter.com/GwX9Fetaij
देवस्थळ ऑब्जर्व्हेटरी या ठिकाणी चार मीटर क्लासच्या दोन टेलिस्कोप आणि देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोपचा सेटअप तयार करण्यात आला आहे. बेल्जिअम, कॅनडा, पोलंडसह आठ देशांच्या मदतीने 2017 साली या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात झाली होती. मधल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे या कामात अडथला आला. त्यानंतर या कामात पुन्हा एकदा गती येऊन आता हे काम पूर्ण झालं आहे.
या टेलिस्कोपच्या मदतीने 95 हजार प्रकाशवर्षे दूरची एनसीजी 4274 आकाशगंगा स्पष्टपणे दिसते. तसेच या आकाशगंगेतील ताऱ्यांचेही स्पष्टपणे निरीक्षण करता येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)