एक्स्प्लोर
4G मध्ये भारत अव्वल, पण इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर
ओपनसिग्नलने याबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये जगभरातील सर्व इंटरनेट स्पीडचा अभ्यास केला गेला.
![4G मध्ये भारत अव्वल, पण इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर 4g internet speed india ranks lowest-in-speed 4G मध्ये भारत अव्वल, पण इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/19133344/Internet_141.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जगभरात 4G चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता 5G सेवा देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. पण असं असलं, तरी इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत अजूनही पिछाडीवर आहे. ओपनसिग्नलने याबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये जगभरातील सर्व इंटरनेट स्पीडचा अभ्यास केला गेला.
ओपनसिग्नलच्या रिपोर्टनुसार, देशात सध्या 4G इंटरनेटचं 86.3 टक्के कव्हरेज आहे. 4G सेवा पुरवण्यामध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेलाही मागे टाकलं आहे. पण असे असले तरी इंटरनेट स्पीडच्या यादीत भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे.
रिपोर्टनुसार, 2017 मध्ये भारतात 4G इंटरनेट स्पीड 6.07 MBPS होता. तर पाकिस्तानमध्ये 4G स्पीड 13.56 MBPS होता. श्रीलंकेत हाच स्पीड 13.95 MBPS होता.
इंटरनेट स्पीडच्या टॉप पाच देशांमध्ये सिंगापूर अव्वल स्थानी आहे. सिंगापूरमध्ये 4G चा इंटरनेट स्पीड 44.31 MBPS आहे. यात दुसऱ्या स्थानावर नेदरलँड असून, तिथे 4G इंटरनेट स्पीड 42.12 एमबीपीएस आहे. तिसऱ्या स्थानावर नॉर्वे 41.20 MBPS, दक्षिण कोरिया 40.44 MBPS, तर पाचव्या स्थानावर हंगेरी 39.18 MBPS स्पीड मिळतो.
दरम्यान, 4G इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कोणत्याही देशाला इंटरनेट स्पीड 50 MBPS देता आलेला नाही. या सर्वेमध्ये एकूण 88 देशांचा समावेश होता. यात थायलँड, बेल्जियम, लाटविया, फिनलँड, उरुग्वे, डेनमार्क आदी देशांचाही समावेश होता. या सर्व देशांमध्ये सरासरी 16.9 MBPS इतका 4G इंटरनेट स्पीड मिळतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)