एक्स्प्लोर
इन्स्टाग्राममध्ये बग शोधणाऱ्या भारतीयाला फेसबुकतर्फे बक्षिस
भारतीय तरूणाला तब्बल २० लाखाचे बक्षिस. फेसबुकने इन्स्टाग्राममध्ये बग शोधल्याबद्दल चेन्नईच्या लक्ष्मण मुथय्याला हे बक्षिस देण्यात आले आहे.

चेन्नई : फेसबुकने इन्स्टाग्राममध्ये बग शोधल्याबद्दल एका भारतीय तरूणाला तब्बल २० लाखाचे बक्षिस दिले आहे. लक्ष्मण मुथय्या असे या तरूणाचे नाव असून तो चेन्नईचा आहे. मुथय्या हा सायबर सिक्युरीटी रीसर्चर आहे. या बगमुळे कोणतेही इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करणे, पासवर्ड बदलणे सहज शक्य होते, असे मुथय्याने सांगितले. इन्स्टाग्रामला हानीकारक असणारे बग शोधल्याबद्दल हे बक्षिस देण्यात आले आहे. सुरुवातीला इन्स्टाग्राममध्ये असणाऱ्या या बगविषयी फेसबुकला माहिती दिली. परंतु माझ्याकडे अपुरी माहिती असल्याने फेसबुक या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. आवश्यक व्हिडीओ, इमेल फेसबुकला सादर केल्यानंत फेसबुकच्या टीमने या गोष्टीवर विश्वास ठेवल्याचे मुथय्याने सांगितले. मुथय्याने सादर केलेल्या माहितीच्या आधारे फेसबुक टीमने ही समस्या दूर केली आहे. मुथय्याला दोन बग सापडले होते. पहिल्या बगमध्ये तुमचा पासवर्ड जाणून न घेता अकाऊंटमधील फोटो डिलीट करता येत होते. तर दुसरा बग हा फोनमध्ये दुसरे अॅप डाउनलोड करण्याची सूचना देत होता. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर बग युजर्सच्या अकाऊटमध्ये जाऊन सर्व फोटो अॅक्सेस करू शकत होता. हे बग मुथय्याने फेसबुकच्या बग बाउंटी कार्यक्रमातंर्गत शोधले होते. हे बग युजर्सपर्यंत पोहचण्याअगोदर फेसबुकने दूर केल्याची माहिती फेसबुकचे पॉल डकलीन यांनी दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
क्रिकेट























