एक्स्प्लोर
Advertisement
दररोज 1.5 जीबी डेटा, 'आयडिया'चा जबरदस्त प्लान
मुंबई: जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया सेल्यूलरनं आता आणखी एक नवा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये आयडिया यूजर्सला दररोज 1.5 जीबी 4जी डेटा देणार आहे. हा प्लान 70 दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लान किंमत 497 रुपये आहे. डेटाशिवाय या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे.
या प्लानमध्ये आयडिया टू आयडिया नेटवर्कलाच अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कसाठी यूजर्सला 3000 मिनिट फ्री मिळणार आहे. 3000 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कॉलला पैसे मोजावे लागतील.
जिओची 'धन धना धन' ऑफर
नुकतंच जिओनं 'धन धना धन' ऑफर बाजारात आणली. त्यामध्ये यूजर्सला 309 रुपये आणि 509 रुपये असे दोन प्लान आहेत. 309 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा तर 509 रुपयांच्या प्लानमध्ये तब्बल 168 जीबी डेटा मिळणार आहे.
एअरटेलचाही 345 रुपयांचा नवा प्लान
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनंही 345 रुपयाच्या प्लान आणला आहे. यामध्ये यूजर्सला 2 जीबी डेटा दररोज मिळणार असून 28 दिवसांपर्यंत हा प्लान वैध असणार आहे.
बीएसएनएलचा देखील नवा डेटा प्लान
जिओ, एअरटेल पाठोपाठ बीएसएनएलनं देखील नवा प्लान लाँच केला आहे. 333 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला 3 जीबी 3जी डेटा दररोज मिळणार आहे. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आहे. हा प्लान 90 दिवसांसाठी वैध असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
परभणी
भारत
करमणूक
Advertisement