एक्स्प्लोर
Advertisement
स्कॉटलंडच्या खेळाडूची ऐतिहासिक खेळी, सलग सहा षटकारांसह अवघ्या 25 चेंडूत शतक
26 वर्षीय मुंसेने 2017 मध्ये हाँग-काँगविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. स्कॉटलंडकडून मुंसेने 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
मुंबई : स्कॉललंड फलंदाज जॉर्ज मुंसे याने अवघ्या 25 चेंडूत शतक ठोकत ऐतिहासिक खेळी केली आहे. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनमधून खेळताना मुंसेने ही कामगिरी केली आहे. याशिवाय सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याच पराक्रमही त्याने केला.
जॉर्ज मुंसे ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनकडून खेळताना बाथ सीसी संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 39 चेंडूत 147 धावा ठोकल्या. मुंसेच्या खेळीमध्ये 20 षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. मुसेंसोबत जीपी विलोजने देखील 53 चेंडूत शतक ठोकलं.
26 वर्षीय मुंसेने 2017 मध्ये हाँग-काँगविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. स्कॉटलंडकडून मुंसेने 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 16 सामन्यांमध्ये मुंसेने 72.02 च्या स्ट्राईक रेटने 381 धावा केल्या आहेत. मुंसेची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 55 सर्वोच्च धावसंख्या आहे. जॉर्ज मुंसेने स्कॉटलंडकडून 26 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 150.67 च्या स्ट्राईक रेटने 559 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय मुंसेने चार प्रथम श्रेणी सामने, 28 लिस्ट ए सामने खेळला आहे. VIDEO | वानखेडे स्टेडियमचा भाडेकरार संपला, एमसीएला राज्य सरकारची नोटीस???? 147 runs ???? 39 balls ???? 20 sixes 6️⃣ sixes in an over@CricketScotland's @GeorgeMunsey smashed a 25-ball ???? for @Gloscricket Second XI yesterday!
READ ????https://t.co/HIDwmBzpKr pic.twitter.com/f2X8yU5q7X — ICC (@ICC) April 22, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement