Swayamvar Mika Di Vohti : स्वयंवरात सहभागी झालेल्या इच्छुक वधुंमध्ये भांडण; मिका सिंहने घेतली मजा
Mika Singh : मिंका सिंहचा 'स्वयंवर मिका दी वोटी' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Swayamvar Mika Di Vohti : लोकप्रिय गायक मिका सिंहचा (Mika Singh) 'स्वयंवर मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या आहेत. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच या मुलींमध्ये भांडण झालेलं पाहायला मिळत आहे.
'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्वयंवरात सहभागी झालेल्या मुलींमध्ये भांडण झालेलं पाहायला मिळालं. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोन मुली फोन आणि मेसेजवरून वाद घालताना दिसत आहेत. दोघी मिका सिंहसमोर एकमेकींना खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मिका सिंह दोघींचे भांडण सोडवायचं सोडून मजा बघताना दिसत आहे. मिका सिंहचा कूल मूड मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
मिका सिंहच्या 'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये सहभागी झालेल्या मुली एकापेक्षा एक आहेत. मिका सिंहदेखील हे ओळखून आहे. मिका बुशरा आणि प्रांतिकासोबत जास्त दिसून आला आहे. सध्या मिका सर्व मुलींना जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मिका कोणत्या मुलीची जोडीदार म्हणून निवड करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का?
स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे. तसेच मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमात ध्वनीसोबत ध्वनीसोबत सोनल तीलवानी, प्रांतिका दास, चंद्राणी दास, बुशरा शेख, आश्लेषा रावले अशा 12 मुली सहभागी झाल्या आहेत.
संबंधित बातम्या
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहचे जोधपूरमध्ये होणार स्वयंवर; 19 जूनपासून कार्यक्रमाला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)