Weight Loss Tips : काहीही न करता वजन झपाट्यानं कमी होतंय? वेळीच सावध व्हा; 'या' आजारांचा वाढता धोका
Weight Loss Tips : अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, कॅन्सरचं पहिलं लक्षण म्हणजे वजन कमी होणं हे आहे.
Weight Loss Tips : स्लिम आणि फिट राहण्याच्या या काळात वजन कमी करण्याचं (Weight Loss) प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मग ते जीम मध्ये जाणं असो, किंवा डाएट करणं असे अनेक प्रयत्न करावे लागतात. तरीही काही लोकांचं वजन कमी होत नाही. पण काहीही न करता तुमचं वजन झपाट्यानं कमी होतंय का? इतरांना वजन कमी करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते तुम्हाला घ्यावे लागत नाही यामुळे तुम्ही खुश आहात का? तर, तुम्ही चुकता आहात. कारण वजन कमी होणं हे अनेक मोठ्या आजारांचं लक्षण आहे. यामुळे कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घ्या.
कोणत्याही गंभीर आजाराच्या सुरुवातीस वजन कमी होणं हे साहजिक आहे. या समस्या खालीलप्रमाणे आहेत.
डिप्रेशन : जेव्हा तुम्ही डिप्रेशनच्या समस्येने त्रस्त असता तेव्हा तुमच्या खाण्यापिण्यात बदल होतो. अशा वेळी तुमचं वजन झपाट्याने कमी होतं. नैराश्याचा मेंदूच्या त्या भागांवर परिणाम होतो जे भूक नियंत्रित करतात, त्यामुळे भूक लागत नाही,
कॅन्सर : अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, कॅन्सरचं पहिलं लक्षण म्हणजे झपाट्याने वजन कमी होणे. ल्युकेमिया लिम्फोमा, कोलन कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर यांमध्ये रुग्णाचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते, खरंतर कॅन्सरमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
हायपरथायरॉईडीझम : हायपरथायरॉईडीझममध्येही वजन कमी होण्यास सुरुवात होते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त थायरॉईड संप्रेरक स्राव करू लागते, तेव्हा हायपरथायरॉईडीझमची समस्या उद्भवते. परिणामी शरीरात अनेक बदल होतात. हे हार्मोन्स चयापचयसह शरीरातील अनेक कार्ये नियंत्रित करतात. जर थायरॉईड ओव्हरएक्टिव्ह असेल तर आरोग्यदायी आहार घेतल्यानंतरही कॅलरीज लवकर बर्न होऊ लागतात, त्यामुळे वजन कमी होऊ लागते.
लिव्हर सिरोसिस : लिव्हर सिरोसिसमध्येही तुमचं वजन अचानक कमी होऊ लागतं. यामध्ये यकृत शरीरासाठी आवश्यक पाचक एंजाइम तयार करू शकत नाही, ज्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो आणि भूक लागत नाही.
मधुमेह : मधुमेहाच्या सुरुवातीला वजन कमी होणं हे एक सामान्य लक्षण आहे. जेव्हा शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही, तेव्हा शरीरातील पेशी रक्तातून आवश्यक प्रमाणात ग्लुकोज घेऊ शकत नाहीत आणि शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. अशा स्थितीत शरीरात चरबी झपाट्याने बर्न होऊ लागते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामुळेच मधुमेहामध्ये वजन अचानक आणि झपाट्याने कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :