एक्स्प्लोर

ट्राफिक पोलिस चिरीमिरी घेताना कॅमेऱ्यात कैद, सोलापुरातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

Traffic Police : पोलिसांनी चिरीमिरी घेताना शूट करण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.  पोलिसांकडून देखील या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आलीय.

सोलापूर :  वाहतूक नियमांचे अनेकांकडून पालन होत नाही, त्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठे दंड आकरण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच झालाय. मात्र याच कडक नियमांचे दाखले देत सर्वसामान्यांची लूट कशा पद्धतीने सुरू आहे याचा प्रकार सोलापुरात समोर आलाय. सोलापुरातील प्रमुख चौकांपैकी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ भर रस्त्यात ट्राफिक पोलिस चिरीमिरी घेताना कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. आज दुपारी एक ते दोनच्या सुमाराची ही घटना आहे. 

सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथे नेहमीच ट्राफिक पोलिस तैनात असतात. आज दुपारी एका वाहन चालकाला येथे उपस्थित असलेल्या दोघांना ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कडक कारवाईचे दाखले देण्यात आले. मात्र नंतर चिरीमीरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आले. आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली. मात्र ही घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरात टिपली. 

व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी चिरीमिरी घेताना शूट करण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.  पोलिसांकडून देखील या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आलीय. व्हिडीओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

तरीही लूट सुरूच

वाहतुकीचे नियम मोडले तर या पूर्वी ट्राफिक पोलिस पावती फाडत असत. त्यासाठी रोख रक्कम घेतली जात असे. हे पैसे घेताना चिरीमिरी देऊन वाहन चालक मोठ्या दंडातून सुटका तर करुन घ्यायचे. मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले. वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला, नंतर डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे मोठा भ्रष्टाचार थांबला.  पण, असं असलं तरी ट्राफिक विभागातील काहींची ही चिरीमिरी घ्यायची सवय काही सुटली नाही. त्यामुळेच मोबाईलचा फक्त धाक दाखवून वाहनचालकांकडून चिरीमिरी घेणं सुरुच आहे. सोलापुलातील घटनेने हेच पुन्हा एकदा दाखवून दिलंय. 

महत्वाच्या बातम्या

Solapur : पालिका आणि विक्रेते यांच्यातील वादावरील सुनावणीपूर्वी प्रमुख जिल्हा न्यायाधीश चौपाटीच्या जागेवर, जागेची केली पाहणी 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget