प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे.
Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे (Dharashiv Lok Sabha Consituency) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका टिप्पणी सुरु आहे. तानाजी सावंत यांनी 'सगळ्या सहकारी संस्थाची याने अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला व अन् भंगार विकलं. खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं', अशी टीका ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली होती. यावरून ओमराजे निंबाळकर यांनी 'मी ४० वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है', अशा शब्दात तानाजी सावंतांना इशारा दिला होता.
आज धाराशिव लोकसभा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana patil) यांच्या प्रचारार्थ बार्शी, सोलापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? लोकांनी तुला निवडून दिलं, पण तू आता लोकांचा बाप का मारायला निघाला? असा घणाघात त्यांनी केला आहे.
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय हे?
तानाजी सावंत म्हणाले की, आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि कडवट शिवसैनिक राहणारच आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं होतं की, तानाजी सावंत तुम्हीच इथला खासदार निवडून आणायचा आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने आता मी माजी म्हणतो खासदार निवडून आणला. प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय हे? अशी टीका त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.
भावनेचे राजकारण इथला मतदार सहन करणार नाही
लोकांनी तुला निवडून दिलं पण तू आता लोकांचा बाप का मारायला निघायला? भावनेचे राजकारण इथला मतदार सहन करणार नाही. आता फक्त विकासाची भाषा चालेल, भावनेची भाषा चालणार नाही. हिंदुत्वाची नाळ तोडून, विकास सोडून तत्कालीन शिवसेनाप्रमुख चालले होते. त्यांच्या विरोधात उभं राहण्याची सुरुवात याचं धाराशिवमधून झाली याचे आपण साक्षीदार आहोत, असा निशाणा त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला. भंगारविक्या नावं याचं पडलेलं होतं. ह्या भंगार चोराने कारखान्याचे वायर विकले, अशीही टीका त्यांनी ओमराजे निंबाळकरांवर केली. तमाशा, हातात गजरा बांधणारा जुनी काहीही ओळख बार्शीची असेल पण आता ओळख बदलली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता तानाजी सावंत यांच्या टीकेवर ओमराजे निंबाळकर नेमकं काय प्रत्युत्तर देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा