Sunil Tatkare : महाराष्ट्राला एकच दादा माहिती होते वसंतदादा, त्यानंतर आता अजित दादा : सुनील तटकरे
Sunil Tatkare : महाराष्ट्राला एकच दादा माहिती होते वसंतदादा त्यानंतर आता एकच दादा अजित दादा, असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी सोलापुरातील अजित पवार गटाच्या मेळाव्यात केले आहे.
Sunil Tatkare सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar Group) कार्यकर्त्यांच्या मेळावा सोलापूरमध्ये होत आहे. या मेळाव्यात सोलापुरातील काही स्थानिक नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी महाराष्ट्राला एकच दादा माहिती होते वसंतदादा त्यानंतर आता एकच दादा अजित दादा, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, बदलत्या राजकारणात अजित दादांनी घेतलेला निर्णय लोकांना किती मान्य आहे, हे आज सोलापूरच्या मेळाव्यात दिसून येतंय. सोलापूर हा विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. आज या ठिकाणी अनेक नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत. त्यामुळे काही लोकांचा पाठिंबा म्हणणे योग्य नाही. लोकांचं प्रतिसाद पाहता महाराष्ट्रातील प्रबळ शक्ती म्हणून अजित दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी नावारूपास येईल, असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले आहे.
...तर त्यांची औकात काय? हे तुम्हाला माहीत
घड्याळ तेच वेळ नवी हे ध्येय आम्ही सांगितलं आहे. तरुणाचे कोणी नेतृत्व स्वतःला म्हणवून घेत असेल तर त्यांची औकात काय? हे तुम्हाला माहिती आहे. मला कोणाचे नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही. अशी टीका त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव न घेता केली आहे. महाराष्ट्राला एकच दादा माहिती होते वसंतदादा त्यानंतर आता एकच दादा अजित दादा असेही त्यांनी म्हटले आहे.
सोलापूरच्या पाण्यासाठी पैसे पाठवले जातील - अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कधी कोणते आजार येईल सांगता येणार नाही. कोरोनात (Corona) आपण अनेकांना गमावले. गोरगरिबांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. देशाला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. सोलापूरने (Solapur) राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. पण सोलापूरला आजही पाणी (Water) मिळत नाही. ऑक्टोबरमध्ये उजनी धरणात 60 टक्के पाणी होते ते आता मायनसमध्ये आहे. सोलापूरच्या पाण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, पुढच्याच आठवड्यात पैसे पाठवले जातील, मी शब्द देतोय, असे यावेळी अजित पवार म्हणाले. मी शब्द देताना शंभरवेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा