Gulabrao Patil : पोलिसांनी संरक्षणासाठी पिस्तूल दिलं, कुणाला मारण्यासाठी नाही; गुलाबराव पाटलांची उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया
Gulabrao Patil : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Gulabrao Patil जळगाव : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत असून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील उल्हासनगर (Ulhasnagar) गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. तो वाद नेमका काय वाद आहे. मी याबाबत काही बोलू शकत नाही. पोलिसांनी संरक्षणासाठी आपल्याला पिस्तूल दिले आहे. कुणाला मारण्याकरता पिस्तूल आपल्याला दिले नाही. आमदारांनी कुठे मारलं, काय मारलं ते मला माहीत नाही. जोपर्यंत मी घटनेची पूर्ण माहिती घेत नाही. तोपर्यंत याबाबत वाच्यता करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
...तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ - गुलाबराव पाटील
उल्हासनगर गोळीबार प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, कुठला मुख्यमंत्री गोळीबार करण्यासाठी कुणाला सांगत नाही. स्वतः विजय वडेट्टीवार सुद्धा सांगणार नाही. तो वाद नेमका काय आहे. ते पक्षाच काम करता म्हणून त्यांच्यात वाद असू शकत नाही. याबाबत पोलीस तपास सुरू असून खरं काय ते समोर येईल. त्यानंतर प्रतिक्रिया देऊ. पोलीस तपास समोर आल्यानंतर जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात गुंडाराज आहे, गँगवॉर रस्त्यावर आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात गँगवॉर होत असेल तर दुर्दैवी आहे. हा प्रश्न मी संसदेत मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार आहे. ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे.
यात फडणवीस यांचा काय संबंध? - छगन भुजबळ
सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर छगन भुजबळ म्हणाले की, फडणवीसांनी सांगितले का गोळ्या मारायला. यात फडणवीस यांचा काय संबंध आहे. दोन लोकांचे वैयक्तिक भांडण आहे. मला पण एक आमदार शिव्या देतोय, धमकी देतोय, फडणवीस कायदेशीर कारवाई करतील, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. अर्थात यात दुसरी बाजू समोर आली आहे. नाहीतर अंतरवाली सराटीसारखे होईल एकच बाजू समोर आली. यात दोन्ही बाजू समोर याव्या, असेही भुजबळ म्हणाले.
आणखी वाचा
मोठी बातमी! उल्हासनगर गोळीबार प्रकरणात फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट...